Train Running Status: 2023 हे वर्ष काही दिवसात सुरु होणार आहे. मात्र, त्याआधीच रेल्वेकडून प्रवाशांना मोठी भेट देण्यात आली आहे. भारतीय रेल्वेने श्री माता वैष्णोदेवी कटरा दरम्यान विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी, रेल्वेने नवी दिल्ली-श्री माता वैष्णोदेवी कटरा दरम्यान विशेष ट्रेन सुरु केली आहे. या ट्रेनचा क्रमांक 01635/01636 असेल.
ट्रेन (Train) क्रमांक 01635 नवी दिल्ली-श्री माता वैष्णो देवी कटरा विशेष ट्रेन नवी दिल्लीहून 30 डिसेंबर 2022 रोजी रात्री 11.30 वाजता धावेल. ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी 11:20 वाजता श्री माता वैष्णोदेवी कटरा येथे पोहोचेल. यानंतर, परत येताना, ट्रेन क्रमांक 01636 श्री माता वैष्णो देवी कटरा – नवी दिल्ली विशेष ट्रेन श्री माता वैष्णोदेवी कटरा येथून 1 जानेवारी 2023 रोजी रात्री 11.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11.40 वाजता नवी दिल्लीला (Delhi) पोहोचेल.
यामध्ये सोनीपत, पानिपत, कर्नाल, कुरुक्षेत्र जंक्शन, अंबाला कॅंट, लुधियाना, जालंधर कॅंट, पठाणकोट कॅंट, जम्मू तवी आणि उधमपूर स्थानकांवर स्टॉपेज देण्यात आले आहेत. याशिवाय दरभंगा-आनंद विहार टर्मिनल दरम्यान द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेनही रेल्वेने जाहीर केली आहे. दरभंगा-आनंद विहार टर्मिनल दरम्यान द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन क्रमांक 05527/05528 चालवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेने दिली.
ट्रेन क्रमांक 0552 दरभंगा - आनंद विहार टर्मिनल द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन दर गुरुवार आणि रविवारी दरभंगा येथून 29 डिसेंबर 2022 ते 30 मार्च 2023 दरम्यान दुपारी 01.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 1.00 वाजता आनंद विहार टर्मिनलला पोहोचेल. यानंतर, ट्रेन क्रमांक 05528 आनंद विहार टर्मिनल-दरभंगा द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन आनंद विहार टर्मिनलवरुन 30 डिसेंबर 2022 ते 31 मार्च 2023 दरम्यान प्रत्येक शुक्रवार आणि सोमवारी दुपारी 03.30 वाजता धावेल.
आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 03.45 वाजता दरभंगाला पोहोचेल. या गाडीला जनकपूर रोड, सीतामढी जंक्शन, बैरगानिया, रक्सौल जंक्शन येथे थांबावे लागेल. नरकटियागंज, गोरखपूर, बस्ती, गोंडा, सीतापूर, मुरादाबाद आणि गाझियाबाद स्थानकांवर स्टॉपेज देण्यात आले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.