Union Home Minister Amit Shah Dainik Gomantak
अर्थविश्व

समाज, विकास आणि राजकारण... इंडिया ग्लोबल फोरमच्या परिषदेत गृहमंत्री अमित शाह करणार मार्गदर्शन

Ashutosh Masgaunde

Society, Development and Politics... Home Minister Amit Shah will guide the India Global Forum conference:

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुढील महिन्यात होणाऱ्या इंडिया ग्लोबल फोरमच्या वार्षिक गुंतवणूक शिखर परिषदेला संबोधित करणार आहेत. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

प्रसिद्धी पत्रकानुसार, केंद्रीय गृहमंत्री शाह 6 मार्च रोजी मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये शिखर परिषदेला संबोधित करतील.

'NXT10' या थीम अंतर्गत, इंडिया ग्लोबल फोरम (IGF) भारताच्या पुढील दशकाच्या विकासाचा मागोवा घेईल कारण देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

'NXT 10' चे आयोजन 5 ते 10 मार्च या कालावधीत होणार आहे आणि त्यामध्ये व्यवसाय, राजकारण, कला आणि संस्कृती क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा समावेश असेल.

या परिषदेता भारताच्या अर्थव्यवस्थेचे संकेत आणि पुढील दहा वर्षांतील भू-राजकीय परिस्थिती यावर चर्चा होणार आहे.

'भारताबद्दल विश्लेषकांना काय चूक वाटते' या बहुप्रतीक्षित सत्रात केंद्रीय मंत्री अमित शाह भारताच्या विकास, राजकारण आणि समाजाविषयी पाश्चात्य जगामध्ये मथळे बनवणाऱ्या विषयांबद्धल आपले मत मांडतील.

IGF चे संस्थापक आणि अध्यक्ष मनोज लाडवा म्हणाले, “गृहमंत्री अमित शाह यांच्या इंडिया ग्लोबल फोरममधील अशा पहिल्या भाषणाची केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर आतुरतेने वाट पाहिली जाईल. मला खात्री आहे की ते त्यांच्या स्पष्ट शैलीत त्यांचे मूल्यांकन करतील."

'NXT10' शिखर परिषदेला उपस्थित राहणाऱ्या इतर प्रमुख व्यक्तींमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे, जे महाराष्ट्राच्या आर्थिक परिदृश्याचे सखोल विश्लेषण करतील.

'NXT10' च्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे बेस्ट सेलिंग लेखक जेफ्री आर्चर आणि अमिष त्रिपाठी यांच्यातील एक मनमोहक संभाषण असेल, जे आधुनिक कथाकथन आणि कथा मांडण्याच्या कलेचा अभ्यास करतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT