Skoda subcompact SUV CNG version 
अर्थविश्व

ब्रेझा-व्हेन्यूचं टेंशन वाढलं! Skoda ची नवी CNG SUV लवकरच होणार लॉन्च; मिळणार आकर्षक डिझाईन अन् प्रीमियम फीचर्स

Skoda Subcompact SUV CNG Version: भारतात खूप कमी वेळात लोकप्रिय झालेली स्कोडाची सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही कायलॅक लवकरच सीएनजी व्हर्जन लॉन्च करणार आहे. एसयूव्हीची वाढती मागणी लक्षात घेता कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

Manish Jadhav

भारतात खूप कमी वेळात लोकप्रिय झालेली स्कोडाची सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही कायलॅक लवकरच सीएनजी व्हर्जन लॉन्च करणार आहे. एसयूव्हीची वाढती मागणी लक्षात घेता कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कायलॅक भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी ब्रेझा, टाटा नेक्सॉन, किआ सोनेट, ह्युंदाई व्हेन्यू आणि महिंद्रा एक्सयूव्ही 3 एक्सओ सारख्या सेगमेंटमध्ये विकली जाते.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेल पॉवरट्रेन पर्यायांव्यतिरिक्त या सेगमेंटमध्ये सीएनजी (CNG) हा आणखी एक चांगला पॉवरट्रेन पर्याय आहे. कायलॅकची मागणी वाढवण्यासाठी स्कोडा या एसयूव्हीमध्ये पेट्रोल-सीएनजी बाय-फ्यूल पॉवरट्रेन सादर करण्याची योजना विचारात घेत आहे. यामुळे ग्राहकांमध्ये सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीची मागणी आणखी वाढेल. तथापि, कंपनीने पॉवरट्रेनबद्दल काहीही स्पष्टपणे सांगितलेले नाही.

स्कोडा कायलॅक पहिल्यांदा नोव्हेंबर 2024 मध्ये भारतात (India) लॉन्च करण्यात आली. तिची बुकिंग 2 डिसेंबर 2024 रोजी सुरु झाली असून तिची डिलिव्हरी 27 जानेवारी 2025 पासून सुरु होईल. कायलॅकची रचना आणि निर्मिती भारतात केली गेली आहे, ज्यामुळे ती भारतीय बाजारपेठेसाठी स्कोडाची पहिली सब-4-मीटर एसयूव्ही बनली आहे. स्कोडा कायलॅकमध्ये शानदार डिझाइन, प्रीमियम मटेरियल आणि दमदार फीचर केबिन, जबरदस्त ट्रान्समिशन आणि 5 स्टार सेफ्टी रेटिंग आहे.

स्कोडा कायलॅक किंमत आणि मायलेज

स्कोडा कायलॅकचे बेस मॉडेल 8.25 लाख रुपयांपासून सुरु होते आणि टॉप मॉडेल 13.99 लाख रुपयांपर्यंत जाते. ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही एकूण 12 मॉडेलमध्ये येते. स्कोडा कायलॅकमध्ये 1000 सीसी थ्री-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 114 बीएचपीची कमाल पॉवर आणि 178 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. हे सिक्स-स्पीड मॅन्युअल किंवा सिक्स-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. मॅन्युअल व्हेरिएंटमध्ये ही एसयूव्ही प्रति लिटर 19.68 किमी आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये 19.05 किमी मायलेज देते.

स्कोडा कायलॅकची वैशिष्ट्ये आणि सुरक्षितता

स्कोडा कायलॅकच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्ले, एअर प्युरिफायरसह ऑटो क्लायमेट कंट्रोल, सनरुफ, इलेक्ट्रिक अ‍ॅडजस्टमेंटसह व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि 6-वे इलेक्ट्रिकली अ‍ॅडजस्टेबल फ्रंट सीट्स आहेत. सुरक्षिततेसाठी, यात 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण आणि ट्रॅक्शन नियंत्रण आहे. यात हिल-होल्ड कंट्रोल, मल्टी-कोलिजन ब्रेकिंग आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) देखील आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Murder: घटस्फोट ठरला, पत्नीवर केले तलवारीने वार; डिचोलीतील खूनप्रकरणी आरोपीस 10 दिवस पोलिस कोठडी

Goa Mangroves: 'खारफुटी हटवा, खाजन वाचवा'! गोवा फाऊंडेशन कोर्टात, पंचायतींकडून पत्रे; का आलीय शेती संकटात? वाचा..

Kala Academy: '..पुन्हा छताचा तुकडा कोसळला'! कला अकादमीला समस्यांचे ग्रहण; 60 कोटींच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

Illegal Houses Goa: एक लाख घरे होणार कायदेशीर? केवळ मालकी हक्क नसलेली घरे ‘बेकायदेशीर’ म्हणून गणली जाणार का!

Rashi Bhavishya 27 July 2025: कौटुंबिक प्रश्न सुटतील,खर्चावर नियंत्रण आवश्यक; आरोग्याची काळजी घ्या

SCROLL FOR NEXT