Share Market: Sensex rises by 600 points Dainik Gomantak
अर्थविश्व

ShareMarket: सुट्टीनंतर बाजार तेजीत Sensex 600 अंकांनी वाढला

मंगळवारी शेअर बाजारात(Share Market) सलग तिसर्‍या व्यापार सत्रात घसरण झाली आणि बीएसईचा सेन्सेक्स 355 अंकांनी खाली आला होता

दैनिक गोमन्तक

ईदच्या सुट्टीनंतर आज बाजार(Share Market) नवीन तेजीत सुरु झाला आहे, सेन्सेक्स (Sensex) 600 अंकांनी वाढत 52,494 सुरु झाला . बातमी लिहिण्यापर्यंत तो 52758 वर पोहचला होता. सेन्सेक्स मधील एकूण 30 शेअर्सपैकी तीन-चतुर्थांश शेअर्सने वाढ नोंदविली आहे . तर निफ्टी(Nifty) 50 मध्ये 160 अंकांची वाढ होत 15,794 वर पोहोचला आहे. (ShareMarket: Sensex rises by 600 points)

बुधवारी बकरीदच्या निमित्ताने इक्विटी, चलन आणि डेरिव्हेटिव्ह्ज बाजार बंद होते. यामुळे बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी गुरुवारी व्यवसायासाठी खुले झाले. यापूर्वी मंगळवारी शेअर बाजारात सलग तिसर्‍या व्यापार सत्रात घसरण झाली आणि बीएसईचा सेन्सेक्स 355 अंकांनी खाली आला होता. जागतिक बाजारपेठेचाही मोठा परिणाम बुधवारी पाहायला मिळाला होता.

20 जुलै रोजी बाजार दिवसभर अस्थिर राहिला होता आणि कामकाजाच्या समाप्तीच्या वेळी सेन्सेक्स 354.89 अंकांनी घसरून 52,198.51 वर आणि निफ्टी 120.30 अंकांनी खाली 15,632.10 वर बंद झाला. सेन्सेक्समधील फक्त 9 आणि निफ्टी 50 मधील 10 शेअर्स तेजीसह बंद झाले होते निफ्टीच्या सेक्टोरल निर्देशांकांविषयी बोलताना निफ्टी एफएमसीजी वगळता इतर सर्व क्षेत्र निर्देशांक घसरणीसह बंद झाले. रिलायन्स आणि टाटा स्टीलसह सर्व बँकिंग समभाग सेन्सेक्सवर विक्री करीत होते.

आजच्या व्यवसायादरम्यान रिलायन्स, जस्ट डायल, रिलायन्स रिटेल, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियावर लक्ष केंद्रित केले जाईल.

तसेच बीएससी वर नोंदणी असणाऱ्या आयआयएफएल सिक्युरिटीज, इंडिया मार्ट,इंडिया पेस्टीसाईड्स, लॉयड्स स्टील्स इंडस्ट्रीज, बँक ऑफ महाराष्ट्र, ईपीसी इंडस्ट्रीज, मफासीस, मुकत पाईप्स, न्यूटाइम इन्फ्रा, कपूर अँड अलाइड प्रॉडक्ट्स, पर्सिस्टिव्ह सिस्टीम्स, पाचेली इंडस्ट्रियल फायनान्स, प्रीमियर पॉलिफिल्म, म्युझिक ब्रॉडकास्ट, रेन इंजिन वाल्व, सह्याद्री इंडस्ट्रीज, सारेगामा इंडिया, शिव सिमेंट, श्री वर्षाटेक्स,साउथ बँक, स्टर्लाईट टेक्नोलॉजीज, सुपर सेल्स इंडिया, सूरज लिमिटेड, टव्हर्नर रिसोर्स, अल्ट्राटेक सिमेंट, व्हिक्टरी पेपर बोर्ड इंडिया, विमटा लॅब्ज, वॉकहार्ट आणि गेनॅलाबस इथिका आर्थिक परिणाम नोंदविणार आहेत, त्यामुळे या शेअर्सवरही व्यापार सुरू असताना लक्ष केंद्रित केले जाईल.

अमेरिकन, युरोपियन आणि आशियाई शेअर बाजाराच्या तेजीचा परिणाम आज देशांतर्गत बाजारात दिसून आला आहे. फ्युचर्स मार्केटमध्ये गुरुवारी जोरदार सुरुवात झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT