Share Settlement: Dainik Gomantak
अर्थविश्व

Share Settlement: गुडन्यूज! खरेदी केलेले शेअर्स, विकलेल्या शेअर्सची रक्कम केवळ एका तासात बँकेत जमा होणार

'सेबी' करणार नियमांत बदल

Akshay Nirmale

Share Settlement: सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी ट्रेड सेटलमेंट नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. SEBI चेअरपर्सन माधबी पुरी बुच यांनी ग्लोबल फिनटेक फेस्ट 2023 मध्ये संबोधित करताना ही माहिती दिली.

पुढील वर्षी मार्चपर्यंत ट्रेड सेटलमेंटची वेळ 1 तासापर्यंत कमी करण्याची आणि त्यानंतर ऑक्टोबर 2024 पर्यंत त्वरित ट्रेड सेटलमेंट लागू करण्याची तयारी करत आहोत, असे त्यांनी सांगितले.

माधबी पुरी बुच म्हणाल्या की, “एक तासाच्या आत डील सेटल करण्याचे तंत्रज्ञान आधीपासूनच आहे. फक्त त्याची अंमलबजावणी करायची आहे. दुसरीकडे, तत्काळ तोडगा काढण्याबाबत बोलताना, व्यवस्थेत काही सुधारणा करण्याची गरज असून, त्यासाठी 6 ते 8 महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

ट्रेड सेटलमेंटबाबत सध्या T+1 नियम

T+1 नियम सध्या ट्रेड सेटलमेंटबाबत लागू आहे. यामध्ये, व्यवहाराच्या दिवशी म्हणजे ट्रेडिंग दिवसाच्या एक दिवसानंतर डील सेटलमेंट होतात. म्हणजेच आज तुम्ही कोणताही शेअर विकत घेतला तर तो उद्या डिमॅट खात्यात जमा होईल.

त्याचप्रमाणे, तुम्ही आज शेअर विकल्यास, उद्या संपूर्ण रक्कम तुमच्या ट्रेडिंग खात्यात जमा होईल.

ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये T+1 सेटलमेंट सिस्टीमबद्दल बोलताना SEBI चेअरपर्सन म्हणाले की T+1 सिस्टीम लागू करण्यात आलेला भारत हा जगातील पहिला देश आहे. आम्ही अशी यंत्रणा बनवत आहोत ज्यामध्ये लोकांना थेट एक्सचेंजमध्ये प्रवेश मिळेल. लोक त्यांचे व्यवहार एक्सचेंजमधून सेटल करू शकतील.

वास्तविक, अनेक वेळा ब्रोकरची सिस्टीम डाउन झाल्यावर लोक त्यांचे शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, लोक एक्सचेंजमध्ये थेट प्रवेश करून शेअर्स विकू आणि खरेदी करू शकतील. मात्र, त्यातही शेअर्स खरेदी करण्याचा पर्याय लोकांना असेल, असे अध्यक्षांनी सांगितले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT