iPhone 15 लॉंच होताच मुकेश अंबानी करणार छप्परफाड कमाई

Apple आयफोनचे नवीन मॉडेल अनेकदा कंपनीसाठी विक्रीत लक्षणीय वाढ करतात आणि यावेळी त्याचा फायदा मुकेश अंबानींनाही होईल.
Apple|iPhone 15|iPhone 15 Pro
Apple|iPhone 15|iPhone 15 ProDainik Gomantak

Mukesh Ambani To Earn Big After iPhone 15 Launch Through Reliance Jio World Drive Mall:

iPhone15, iPhone 15 Pro लॉन्चला आता फक्त एक आठवडा राहिला आहे. Apple चे हे फोन्स गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करत आहेत.

Apple iPhone 15 सिरीजचे उत्पादन गेल्या आठवड्यात सुरू झाले असून, नवीन iPhones विक्रीसाठी जाणार्‍या पहिल्या देशांमध्ये भारत भारताचा समावेश आहे.

Apple iPhone 15 सिरीज भारतीय बाजारपेठेसाठी महत्त्वाची असणार आहे. कारण कंपनीने काही महिन्यांपूर्वी Apple Store ची भारतात अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. Apple iPhone 15 सिरीज भारतात Apple Store द्वारे विकली जाईल.

Apple iPhone 15, Apple iPhone 15 Pro हे सर्वात अत्याधुनिक Apple iPhones पैकी आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हे फोन भारतात लॉंच होताच मोठी कमाई करतील.

Apple|iPhone 15|iPhone 15 Pro
Chai Sutta Bar: बापाला कळू न देता सुरू केलेला व्यवसाय आज 100 कोटींच्या पुढे गेलाय

Apple चे भारतातील पहिले रिटेल स्टोअर, मुंबईतील अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये आहे. मुकेश अंबानींच्या मॉलसोबत Apple च्या करारानुसार, Apple कंपनी पहिल्या तीन वर्षांसाठी रिलायन्स जिओ मॉलला 2% महसूल वाटा द्यावा लागेल.

पहिल्या तीन वर्षानंतर महसूल वाटा 2.5% पर्यंत वाढेल. इकॉनॉमिक टाइम्सच्या जुन्या अहवालानुसार, Apple ने स्टोअर सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी 10 कोटी रुपयांची विक्री नोंदवली आणि एका महिन्यात स्टोअरने सुमारे 25 कोटी रुपयांची विक्री झाली. याचा अर्थ मुकेश अंबानींना 42 लाख रुपयांच्या भाड्याव्यतिरिक्त 50 लाख रुपये महसूल वाटा म्हणून मिळाले.

Apple iPhone 15 सिरीजमुळे Apple कडे मोठ्या संख्येने ग्राहक आकर्षित होण्याची अपेक्षा आहे. Apple आयफोनचे नवीन मॉडेल अनेकदा कंपनीसाठी विक्रीत लक्षणीय वाढ करतात आणि यावेळी त्याचा फायदा मुकेश अंबानींनाही होईल.

Apple|iPhone 15|iPhone 15 Pro
अवघ्या काही मिनिटांत बदलता येते Aadhar Card वरील जन्म तारीख, फॉलो करा या स्टेप्स

Apple Store, जिओ वर्ल्ड ड्राइव्हच्या पश्चिम प्रवेशद्वारावर आहे. मुंबतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे. येथे वॉलेट पार्किंगसह ग्राहकांना विविध सेवा दिल्या जातात.

अंबानीच्या मालकीच्या मॉलने Apple साठी एक एक्सक्लुझिव्हिटी झोन ​​मंजूर केला आहे, जिथे Amazon, Facebook, Google, LG, Microsoft, Sony आणि इतरांसह 22 स्पर्धक ब्रँड्सना मॉलच्या एक्सक्लुझिव्हिटी झोनमध्ये जाहिराती प्रदर्शित करण्यास मनाई आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com