Share Market: Sensex Falls by 600 points investors in big loss Dainik Gomantak
अर्थविश्व

शेअर बाजार कोसळला, दोनच दिवसात गुंतवणूकदारांचे 9.45 लाख कोटी रुपये बुडाले

सेन्सेक्स 482 अंकांनी घसरून 57,983.95 वर सुरू झाला आहे. अशा निराशाजनक सुरवातीनंतरही बाजारात घसरण वाढतच गेली आणि सेन्सेक्स 748 अंकांनी घसरून 57,718.34 च्या पातळीवर गेला.

दैनिक गोमन्तक

शेअर बाजारात (Share Market) आजही मोठ्या प्रमाणात घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्स (Sensex)मध्ये देखील मोठी घसरण झाली आहे. आशियाई बाजारातून मिळालेल्या कमजोर संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात आज देखील घसरणीने झाली आहे आयटी, बँक, ऑटो आणि फार्मा शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे सेन्सेक्स 482 अंकांनी घसरून 57,983.95 वर सुरू झाला आहे. अशा निराशाजनक सुरवातीनंतरही बाजारात घसरण वाढतच गेली आणि सेन्सेक्स 748 अंकांनी घसरून 57,718.34 च्या पातळीवर गेला. तर निफ्टी 17300 च्या खाली घसरला.(Share Market: Sensex Falls by 600 points investors in big loss)

हेवीवेट्स इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस या कंपन्यांच्या कमजोरीमुळे बाजारावर दबाव आला आहे. मात्र, मेटल आणि रियल्टी शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे.

दोनच दिवसात गुंतवणूकदारांचे बुडाले 9.45 लाख कोटी रुपये

सोमवारी शेअर बाजारात जोरदार विक्री होत असताना गुंतवणूकदारांचे एकूण 8,21,666.7 कोटी रुपयांचे भांडवल बुडाले आहे . दिवसभरातील व्यवहारादरम्यान एका वेळी सेन्सेक्स 1,624.09 अंकांनी खाली आला होता. सेन्सेक्समध्ये मोठ्या घसरणीमुळे BSE-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल रु. 8,21,666.7 कोटींनी घसरून रु. 2,60,98,530.22 कोटी रुपये झाले होते .

त्याच वेळी, बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप मंगळवारी 1,23,474.43 कोटी रुपयांनी घसरून 2,59,75,055.79 कोटी रुपयांवर आले. अशा प्रकारे, BSE सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप दोन दिवसांत 9,45,141.13 कोटी रुपयांनी कमी झाले आहे.

सोमवारी, BSE 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1,170.12 अंकांनी किंवा 1.96 टक्क्यांनी घसरून 58,465.89 वर आला. सलग चौथ्या सत्रात सेन्सेक्समध्ये घसरण झाली. दोन महिन्यांतील सेन्सेक्सची ही सर्वात कमी बंद पातळी आहे. १२ एप्रिलनंतर सेन्सेक्सची एकाच दिवसातील ही सर्वात मोठी घसरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT