LIC ची जीवन अक्षय योजना, एकरकमी गुंतवा आणि मिळवा महिना 20,000 रुपयापर्यंत पेन्शन

एलआयसीच्या जीवन अक्षय योजनेत तुम्ही स्वत:साठी किंवा कुटुंबातील सदस्यासाठी गुंतवणूक करू शकता. जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा दर महिन्याला पेन्शन घेऊ शकता
LIC Jeevan Akshay policy invest one time and get monthly pension
LIC Jeevan Akshay policy invest one time and get monthly pension Dainik Gomantak
Published on
Updated on

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ग्राहकांना अनेक प्रकारच्या विमा योजना ऑफर करते. LIC ची अशीच एक पॉलिसी जीवन अक्षय आहे, ज्यामध्ये एकरकमी पैसे जमा केल्यावर आजीवन पेन्शन मिळते. या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पॉलिसी घेताना पॉलिसीधारकाला संपूर्ण आयुष्यासाठी किती पेन्शन मिळेल याची खात्रीशीर माहिती असते.(LIC Jeevan Akshay policy invest one time and get monthly pension)

एलआयसीच्या जीवन अक्षय योजनेत तुम्ही स्वत:साठी किंवा कुटुंबातील सदस्यासाठी गुंतवणूक करू शकता. जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा दर महिन्याला पेन्शन घेऊ शकता. या योजनेत इतरही अनेक फायदे आहेत. तुम्ही गुंतवणूक करताच पॉलिसी जारी केली जाते, तीन महिन्यांनंतर तुम्ही कर्ज सुविधेचा लाभ देखील घेऊ शकता. या योजनेत गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा देखील नाही.

काय आहे जीवन अक्षय योजना पॉलिसी

ही सिंगल प्रीमियम नॉन-लिंक्ड नॉन-पार्टिसिपिंग आणि वैयक्तिक वार्षिकी पॉलिसी आहे. यामध्ये किमान 1 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही 1 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला वार्षिक 12,000 रुपये पेन्शन मिळणार आहे.

35 ते 85 वयोगटातील लोक अक्षय योजना पॉलिसी घेऊ शकतात. कुटुंबातील कोणतेही दोन सदस्य संयुक्त वार्षिकी घेऊ शकतात. त्याचबरोबर या पॉलिसीची पेन्शन मिळवण्यासाठी 10 विविध पर्याय आहेत.

LIC Jeevan Akshay policy invest one time and get monthly pension
करिअरमध्ये ऑटेमेशनमुळे कसे बदल होतील? जाणून घ्या वेबिनारमधून

LIC च्या जीवन अक्षय-VII पॉलिसीमध्ये एकूण 10 पर्याय असतील. एक पर्याय आहे ज्यामध्ये तुम्हाला एका प्रीमियमवर दरमहा 20 हजार रुपये पेन्शन मिळते. तुम्हाला ही पेन्शन दर महिन्याला हवी असेल, तर तुम्हाला दरमहा पेन्शनचा पर्याय निवडावा लागेल. गणनेनुसार, दरमहा 20,000 रुपये पेन्शन मिळविण्यासाठी, तुम्हाला एकावेळी 40,72,000 रुपये गुंतवावे लागतील. आणि मग तुमचे मासिक पेन्शन 20,967 रुपये असेल.

तुम्हाला आवश्यक असलेल्या पेन्शनच्या रकमेनुसार दिलेल्या पर्यायांमधून निवडा आणि त्या आधारावर तुम्हाला गुंतवायची असलेली रक्कमगुंतवता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com