Share Market: Sensex down by 700 points investors loss 4.82 lakh crore rupees  Dainik Gomantak
अर्थविश्व

शेअर मार्केट 700 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी बुडाले

सेन्सेक्समध्ये मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना 4.82 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमन्तक

जागतिक बाजारात सुरू असलेल्या घसरणीमुळे आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजार (Share Market) मोठ्या प्रमाणात खाली येताना दिसत आहे. आज बाजारात एचडीएफसी(HDFC), रिलायन्स(Reliance), इन्फोसिसच्या (Infosys) शेअर्सच्या घसरणीमुळे सेन्सेक्स (Sensex) 700 अंकांनी घसरला आहे . त्याच वेळी, निफ्टीही (Nifty) 200 पेक्षा जास्त अंकांनी घसरला आहे. सुरुवातीच्या घसरणीनंतर, बाजारात खालच्या स्तरावरून थोडी रिकव्हरी झाली आहे. सध्या सेन्सेक्स 345 अंकांनी घसरून 59,639 वर व्यापार करत आहे, तर निफ्टी 70 अंकांनी घसरून 17780 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.मात्र मार्केट पुन्हा खाली जाईल अशी शक्यता तद्यांनी वर्तवली आहे. (Share Market: Sensex down by 700 points investors loss 4.82 lakh crore rupees)

बाजारात झालेल्या विक्रीमुळे गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला आहे. सुरुवातीच्या व्यवसायातच त्यांच्या संपत्तीत 1.68 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. दोन दिवसांत झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे एकूण 6.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.बँकिंग, एफएमसीजी आणि ऊर्जा कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे गुरुवारी सेन्सेक्स 1,159 अंश घसरून 59,984.70 अंकांवर बंद झाला होता . सेन्सेक्समध्ये मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना 4.82 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

IRCTC चे शेअर्स आज 25 टक्क्यांनी घसरले आहेत . खरं तर, रेल्वे मंत्रालयाने इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC ला पत्र लिहून सुविधा शुल्कातून मिळणाऱ्या कमाईतील 50 टक्के वाटा मागितला आहे.सरकारच्या या निर्णयामुळे IRCTC च्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. बीएसईवर स्टॉकमध्ये 25% लोअर सर्किट आहे. शेअर 25 टक्क्यांनी घसरून 685.35 रुपयांवर आला आहे.

कालही बाजार मोठ्या घसरणीसहच बंद झाला होता काल बाजारच्या शेवटच्या व्यवहारात, बीएसईचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 1158.63 अंकांनी घसरून 59,984.70 वर बंद झाला होता. तर दुसरीकडे सेन्सेक्ससोबत निफ्टीमध्येही घसरण दिसून आली होती. NSE चा प्रमुख निर्देशांक निफ्टी देखील 353.70 अंकांनी घसरून 17,857.25 वर बंद झाला होता.

सध्याच्या घडीला सेनसेक्स 59,967.99 अंकावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud: 'अनन्या'च्या जाळ्यात अडकला एसबीआय क्लर्क, फेसबुकवरची एक फ्रेंड रिक्वेस्ट अन् 92 लाखांचा गंडा; काय नेमकं प्रकरण?

बेतुल ONGC परिसरात अग्नितांडव! वेल्डिंगच्या ठिणगीमुळे भीषण आग; प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

IND vs SA 4th T20: 'तीन पोती गहू विकून आलो होतो...', भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द झाल्याने चाहत्याचा टाहो; BCCI वर टीकेची झोड VIDEO

Viral Video: ब्रेकअप झालं अन् तिनं चक्क Chat GPT सोबत केलं लग्न; AI पार्टनरच्या प्रेमात बुडाली जपानी तरुणी Watch

Stokes- Archer Fight: अ‍ॅशेसमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भरमैदानात भिडले Watch Video

SCROLL FOR NEXT