शेअर बाजारात (Share Market) सेन्सेक्सने (Sensex) प्रथमच 60 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, सेन्सेक्सने 60,333 अंकांचे नवीन शिखर गाठले आहे . इन्फोसिस (Infosys), एल अँड टीसह (L&T) अर्धा डझनहून अधिक कंपन्यांचे शेअर्स मार्केटच्या (Stock Market) उच्च स्थानी पोहोचले आहेत.तर एनटीपीसीच्या शेअरमध्ये सर्वात मोठी घसरण नोंदवण्यात आली हाये . तर दुसरीकडे निफ्टी 50 सुद्धा 50 देखील कालच्या 17,920 पर्यंत पोहोचला आहे. (Share Market on historical high Sensex crossed 60 thousand)
याआधी गुरुवारी देखील शेअर बाजारात जोरदार तेजी आल्यामुळे बीएसई सूचीबद्ध असलेलया कंपन्यांचे बाजार भांडवल 261.73 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे. सर्वत्र होत असलेल्या खरेदीमुळे बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 958.03 अंकांनी वाढून 59,885.36 च्या सर्वकालीन उच्चांकावर बंद झाला होता . ट्रेडिंग दरम्यान एका टप्प्यावर, ते 1,029.92 अंकांनी वाढून 59,957.25 च्या पातळीवर देखील पोहोचले होते.
शेअर बाजारातील तेजीमुळे बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 3,16,778.1 कोटी रुपयांनी वाढून 2,61,73,374.32 कोटी रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले आहे सेंट्रम ब्रोकिंगचे इक्विटी अॅडव्हायझरीचे प्रमुख देवांग मेहता म्हणाले की, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखांचे विधान बाजाराने चांगले स्वीकारले आहे, मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की नोव्हेंबरमध्ये बॉण्ड खरेदीच्या वेळापत्रकात बदल करण्याची घोषणा केली जाऊ शकते.
काल गुंतवणूकदारांनी देखील बाजारात विक्रमी वेगाने कमाई केली होती . अवघ्या अर्ध्या तासाच्या व्यवसायामध्ये त्यांची संपत्ती 2.50 लाख कोटी रुपयांहून अधिक वाढली होती . बुधवारी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 2,58,56,596.22 कोटी रुपये होते, जे 2,57,877.21 कोटी रुपयांनी वाढून आज 2,61,14,473.43 कोटी रुपये झाले होते .
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.