OYO IPO of1billion dollars will launch soon
OYO IPO of1billion dollars will launch soonDainik Gomantak

OYO चा 1 अब्ज डॉलर्सचा IPO लवकरच बाजारात

OYO IPO व्यवस्थापित करण्यासाठी कंपनीने जेपी मॉर्गन , सिटी बँकआणि कोटक महिंद्रा कॅपिटलसारख्या गुंतवणूक बँकांची नियुक्ती केली आहे.
Published on

OYO कंपनी लवकरच आपला IPO बाजारात आणणार आहे. असे मानले जाते की कंपनी 1 अब्ज डॉलर्सच्या आयपीओबाबत पुढील आठवड्यात सेबीला कागदपत्रे सादर करू शकते. OYO ने IPO व्यवस्थापित करण्यासाठी जेपी मॉर्गन (JP Morgan), सिटी बँक(City Bank) आणि कोटक महिंद्रा कॅपिटल (Kotak Mahindra Capital) सारख्या गुंतवणूक बँकांची नियुक्ती केली आहे.(OYO IPO of 1billion dollars will launch soon) (OYO IPO)

नियामक सूचनेनुसार, गेल्या आठवड्यात OYO ची मूळ कंपनी Oravel Stage च्या भागधारकांनी कंपनीला खाजगी मर्यादित कंपनीतून सार्वजनिक मर्यादित कंपनीमध्ये रुपांतर करण्यास मान्यता दिली आहे . यापूर्वी, ओरॅवेल स्टेजच्या बोर्डाने कंपनीचे अधिकृत भागभांडवल 1.17 कोटी रुपयांवरून 901 कोटी रुपये करण्यास मंजुरी दिली होती.

OYO IPO of1billion dollars will launch soon
देशातील या दोन बड्या बँकांचे Cheque Book 1ऑक्टोबरपासून होणार निकामी

OYO हॉटेल्सला सॉफ्टबँकचा पाठिंबा आहे आणि त्यात 46 टक्के हिस्सा आहे. कोरोना महामारीमुळे हॉटेल उद्योगाला मोठा फटका बसला आहे. ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांनी जुलैमध्ये सांगितले की दुसऱ्या लाटेनंतर व्यवसाय पुन्हा एकदा तेजीत येऊ लागला आहे.गेल्या महिन्यात, ओयोला मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनकडून 5 दशलक्ष म्हणजेच 350 दशलक्ष निधी मिळाला. या आयपीओसाठी कोटक महिंद्रा कॅपिटल, जेपी मॉर्गन आणि सिटी बँक यांना बँकर्स म्हणून नियुक्त केले आहे. असे मानले जाते की ओयोचे मूल्यांकन 14-16 अब्ज डॉलर असेल.

जुलैमध्ये फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोने आयपीओ आणला होता, ज्याला गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. येत्या काळात पेटीएम आणि नायका सारख्या कंपन्याही आयपीओ आणत आहेत. याशिवाय ओला आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. एकंदरीत, सर्व यशस्वी स्टार्टअप सध्या शेअर बाजारात येऊ पाहत आहेत.

OYO IPO of1billion dollars will launch soon
भारती एअरटेलचा 21,000 कोटी रुपयांचा 'राइट्स इश्यू', गुंतवणूकदारांची चांदी

जेव्हा जेव्हा एखादी कंपनी किंवा सरकार पहिल्यांदा सामान्य लोकांना काही शेअर्स विकण्याचा प्रस्ताव देते तेव्हा या प्रक्रियेला इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) म्हणतात. IPO मध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदार चांगले पैसे कमवू शकतात. गेल्या वर्षी कंपन्यांनी प्राथमिक बाजारातून 31,000 कोटी रुपये उभारले. एकूण 16 आयपीओ लाँच झाले, त्यापैकी 15 दुसऱ्या सहामाहीत लॉन्च झाले. 2019 च्या पूर्ण वर्षात 16 आयपीओद्वारे 12,362 कोटी रुपये उभारले गेले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com