SEBI, DRI probing Adani group companies for non-compliance of rules Dainik Gomantak
अर्थविश्व

अदानी ग्रुपवर चौकशीची टांगती तलवार

कॅपिटल मार्केट रेग्युलेटर सेबी(SEBI) आणि डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (DRI) अदानी समूहातील(Adani Group) काही कंपन्यांची चौकशी करत आहेत(Gautam Adani)

दैनिक गोमन्तक

कॅपिटल मार्केट रेग्युलेटर सेबी(SEBI) आणि डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (DRI) अदानी समूहातील(Adani Group) काही कंपन्यांची चौकशी करत आहेत. या कंपन्यांवर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. अर्थ राज्यमंत्री(Finance Minister) पंकज चौधरी यांनी सोमवारी लोकसभेत ही माहिती दिली. तथापि, त्यांनी तपासात असलेल्या कंपन्यांची नावे किंवा कोणत्या प्रकारच्या नियमांचे उल्लंघन केले याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.

याबद्दल माहिती देताना अर्थ राज्यमंत्री म्हणाले की इंफोर्समेंट डायरेक्टरेट (ईडी) या ग्रुप कंपन्यांचा तपास करत नाही. सरकारने सभागृहात हे उत्तर दिल्यानंतर अदानी ग्रुपशी संबंधित सहा कंपन्यांचे शेअर्स 1.1 वरून 4.8 टक्क्यांनी घसरले आहेत . यासंदर्भात अदानी समूहाच्या प्रवक्त्याने सांगितले की आम्ही सेबीच्या नियमांचे नेहमीच पालन करीत आहोत आणि अलिकडच्या काळात बाजार नियामकांनी केलेल्या कोणत्याही तपासणीची माहिती नाही. आतापर्यंत डीआरआयने केलेल्या तपासाचा प्रश्न आहे, पाच वर्षांपूर्वीही चौकशी एजन्सीकडून कारणे दाखवा नोटीस मिळाली होती.

जरी एजन्सीला तपासात काही चूक आढळली नसली तरीही त्यासंबंधित वाद हा न्यायालयात प्रविष्ठ आहे. गेल्या महिन्यात अदानी समूहाच्या काही कंपन्यांमध्ये मोठी विक्री झाली होती. त्या कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक करणाऱ्या तीन परदेशी पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स (एफपीआय) ची खाती गोठवल्याची बातमी गेल्या 18 जून रोजीही झाली होती. तथापि, नंतर या समूहाने गुंतवणूकदारांची खाती गोठवल्याची बातमी पूर्णपणे नाकारली होती.

या सगळ्या घटनांचा मात्र अदानी ग्रुप च्या शेअर बाजार वर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे कारण काल अदानी पोर्टचे शेअर्स 13.75 ने खाली येऊन 673.85 वर पोहोचले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT