SBI Dainik Gomantak
अर्थविश्व

SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी अलर्ट! बँकेच्या 'या' 7 सेवांपासून राहवं लागणार वंचित

बॅंकेने (SBI) दिलेल्या माहितीनुसार, 4 ते 5 सप्टेंबरच्या रात्री देखभाल उपक्रमांसाठी या सेवा तीन तासांसाठी बंद राहणार आहेत.

दैनिक गोमन्तक

एसबीआयने (SBI) आपल्या करोडो ग्राहकांसाठी अलर्ट जाहीर केला आहे. आता भारतीय स्टेट बॅंकेच्या 4 ते 5 सप्टेंबर काही तासांसाठी इंटरनेट बॅंकिंगसह (Internet Banking) 7 प्रकारच्या सेवा बंद करण्यात येणार आहेत. बॅंकेकडून या सेवा तात्पुरत्या काळासाठी विस्कळीत होतील असे सांगण्यात आले होते. बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार, 4 ते 5 सप्टेंबरच्या रात्री देखभाल उपक्रमांसाठी या सेवा तीन तासांसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे या काळात एसबीआय ग्राहक बॅंकिंग सेवा वापरता येणार नाहीत. एसबीआयने ग्राहकांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

दरम्यान, देखभाल 4 सप्टेंबर रोजी 22.35 ते 5 सप्टेंबर रोजी दुपारी 01.35 पर्यंत सुरु राहतील. या काळामधये इंटरनेट बॅंकिंग, YONO, YONO लाईट, YONO बिझनेस आणि IMPS आणि UPI सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध होणार नाहीत, असही एसबीआयकडून कळविण्यात आले आहे. तसेच एसबीआयने आपल्या सोशल मिडियावरील ट्वीटरद्वारे यासंबंधीची माहिती दिली आहे. वेळोवेळी आपल्या डिजिटल बॅंकिग प्लॅटफॉर्मचं मेंटेनस एसबीआय करते. मागील महिन्यामध्ये देखभालीच्या कामांमुळे भारतीय स्टेट बॅंकेच्या सेवाही काही काळासाठी विस्कळीत झाल्या होत्या.

शिवाय, डिजिटल ग्राहकांना या काळामध्ये योनो, योनो लाईट, इंटरनेट बॅंकिग, युनिफाईड पेमेंट इंटरफेसच्या सेवांचा लाभ मिळू शकत नाही. प्रत्येक वेळी बॅंकेकडून ग्राहकांना पूर्वसूचना देण्यात येते. एसबीआय YONOत सध्या 3.5 कोटी नोंदणीकृत वापरकर्ते आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने ग्राहक असल्याने एसबीआय रात्रीच्या वेळी देखभालीचे काम करते, जेणेकरुन ग्राहकांना कमीत कमी त्याचा फटका बसू शकेल. एसबीआयचे सध्या यूपीआय वापरकर्त्यांची संख्या 13.5 कोटींपेक्षा जास्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mungul Crime: मुंगूल गँगवॉरप्रकरणी नवी अपडेट! अन्य 11 संशयितांचा जामिनासाठी अर्ज; नायायालयात होणार सुनावणी

Goa ZP Election Result 2025 Live Update: मायकल लोबोंना धक्का; कळंगुटमध्ये काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर

Goa Crime: ‘ते’ तोतया पोलिस महाराष्ट्रातील असल्याचा अंदाज! CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; मराठीत बोलत असल्याचे उघड

Goa Politics: खरी कुजबुज; ‘त्‍या’ मंत्री, आमदारांच्‍या गोटात खळबळ

Goa Leopard Accident: ..अचानक बिबट्या आला धावत, दुचाकीला दिली धडक, चालक कोसळला जमिनीवर Watch Video

SCROLL FOR NEXT