SBI ची मान्सून ऑफर अनेक कर्जांवरती मिळणार 100% सूट

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI आपल्या ग्राहकांसाठी यावर्षीची मान्सून ऑफर (SBI Monsoon Offer) घेऊन आली आहे.
SBI's Monsoon offer  100% discount on many loans
SBI's Monsoon offer 100% discount on many loansDainik Gomantak
Published on
Updated on

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI आपल्या ग्राहकांसाठी यावर्षीची मान्सून ऑफर (SBI Monsoon Offer) घेऊन आली आहे. या ऑफरमधील सर्वात मोठी बाब म्हणजे आता ग्राहकांना स्टेट बँकेने कोणत्याही माध्यमातून कार कर्जासाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना प्रक्रिया शुल्कावर 100% सूट जाहीर केली आहे (SBI Loan Offer). या व्यतिरिक्त, जर तुम्ही कार कर्ज (Loan) घेणार असाल, तर स्टेट बँक तुमच्या वाहनाच्या ऑन-रोड किमतीच्या 90 टक्क्यापर्यंत कर्ज देणार आहे. यापूर्वीही अशीच ऑफर देत बँकेने आपल्या ग्राहकांसाठी गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्कामध्ये 100% सूट जाहीर केली होती.(SBI's Monsoon offer 100% discount on many loans)

तसेच जर तुम्ही YONO अॅप वापरत असाल तर आता स्टेट बँकेच्या मोबाईल अॅप YONO द्वारे कार कर्जासाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना व्याजामध्ये 0.25 टक्के सूट मिळू शकते. अशाप्रकारे,म्हणजेच YONO SBI वापरकर्ते फक्त 7.5 टक्के वार्षिक व्याज दराने कर्ज घेऊन त्यांच्या आवडीची कार त्यांच्या घरी आणू शकतात.

SBI's Monsoon offer  100% discount on many loans
बँकेत नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे

SBI चे गोल्ड लोनही झाले स्वस्त

भारतीय स्टेट बँक आपल्या सुवर्ण कर्जाच्या ग्राहकांना व्याजदरात 0.75 टक्के सूट देत आहे. एसबीआय ग्राहक आता कोणत्याही माध्यमातून बँकेकडून 7.5 टक्के व्याज दराने सुवर्ण कर्ज घेऊ शकतात. जर तुम्ही YONO द्वारे सुवर्ण कर्ज अर्ज करत असाल तर तुम्हाला प्रक्रिया शुल्कावर 100% सूट मिळेल.

SBI ने कोणत्याही कर्जमार्फत वैयक्तिक कर्ज आणि पेन्शन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना प्रक्रिया शुल्कावर 100% सूट देण्याचीही घोषणा केली आहे.

कोविड योद्ध्यांना स्वस्त कर्ज

बँकेने कोविड वॉरियर्स सारख्या 'फ्रंटलाइन हेल्थकेअर वर्कर्स' ला वैयक्तिक कर्जावरील व्याजदरात 0.50 टक्क्यांपर्यंत सूट जाहीर केली आहे. ही ऑफर लवकरच कार आणि सुवर्ण कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी उपलब्ध होईल अशी माहितीही बँकेने दिली आहे.

SBI's Monsoon offer  100% discount on many loans
अर्थमंत्र्यांची बँकांच्या प्रमुखांसोबत महत्वाची बैठक, या मुद्यांवर होणार चर्चा

स्वातंत्र्य दिनाची खास ऑफर

त्याचबरोबर भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बँकेने 'प्लॅटिनम मुदत ठेव' सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे, बँकेचे ग्राहक 75 दिवस, 75 आठवडे आणि 75 महिन्यांच्या मुदत ठेवींवर 0.15 टक्के अतिरिक्त व्याज मिळवू शकतात. ही ऑफर 15 ऑगस्ट 2021 ते 14 सप्टेंबर 2021 पर्यंत वैध असणार आहे.

या ऑफेरवेळी एसबीआयचे एमडी (रिटेल आणि डिजिटल बँकिंग) सीएस सेट्टी म्हणाले, “सणासुदीच्या अगोदर आमच्या सर्व रिटेल ग्राहकांसाठी अनेक ऑफर्सची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला विश्वास आहे की या ऑफर आमच्या ग्राहकांना त्यांच्या कर्जावर अधिक बचत करण्यास मदत करतील आणि त्याचबरोबर ग्राहक सणासुदीचा पूर्ण आनंद घेऊ शकतील. आमच्या सर्व मौल्यवान ग्राहकांना सर्वोत्तम आर्थिक उपाय प्रदान करणे आणि त्यांच्या गरजा आणि आवश्यकता पूर्ण करण्यात त्यांना मदत करणे आमचा सततचा प्रयत्न आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com