Indian Post Scheme
Indian Post Scheme Dainik Gomantak
अर्थविश्व

Post Office 'या' योजनेत दररोज करा 70 रुपये जमा आणि मिळवा भरगोस पैसे

दैनिक गोमन्तक

बाजारात अश्या अनेक योजना आहेत ज्याने कमी किंमतीच्या गुंतवणूकीवर सुध्दा मोठा परतावा मिळू शकतो. त्यामुळे योग्य योजनेची ची निवड करणे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे सरकार समर्थित योजना सामान्यतः ग्राहकांना जास्त आकर्षित करतात. इंडिया पोस्टने ऑफर Indian Post Scheme केलेल्या बचत योजना देखील लोकांच्या पसंतीस उतरतात. आणि अशी एक योजना पोस्ट ऑफिस मध्ये सुरू आहे. ती म्हणजे पोस्ट ऑफिस (Post Office) आवर्ती ठेव ठेव खाते.

या योजनेतील व्याज हे दर तीन महिन्यांसाठी चक्रवाढ आहे, त्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या मुलाच्या नावावर हे खाते (Account) उघडू शकतो. जेणेकरून त्यांना सुरक्षित आर्थिक (Economy) भविष्याची गॅरंटी मिळेल. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी हा 5 वर्षांचा आहे. जर एखाद्या ग्राहकाने त्यांच्या मुलाच्या नावावर खाते उघडायचे असेल तर त्यांना त्यांचे कायदेशीर पालक म्हणून लिस्टेड करणे आवश्यक आहे.

किती मिळणार योजनेचे उत्पन्न :

मुलासाठी आरडी RD खाते उघडणारे कोणतेही पालक दररोज 70 रुपये जमा करू शकतात. दररोज 70 रू. याप्रमाणे महिण्याला 2100 रुपये जमा होतात. मॅच्युरिटीवर म्हणजेच 5 वर्षांच्या शेवटी, पालकांच्या खात्यात 1,26,000 रुपये असतील. यासह व्याज दर विचारात घेतला जातो, जो तिमाही चक्रवाढ असतो. एप्रिल 2020 पासून आरडी खातेधारकाला 5.8% व्याजदर दिला जात आहे. यामुळे 5 वर्षांच्या शेवटी त्याला 20,000 रुपये व्याज मिळते. अशा प्रकारे, धारकाच्या आरडी खात्यातील रक्कम 1,46,000 रुपये असेल.

आरडी खाते उघडण्यापूर्वी इतर गोष्टी जाणून घ्या

पात्रता: ही योजना कोणत्याही भारतीय नागरिकाला जास्तीत जास्त 3 प्रौढांसाठी सिंगल किंवा संयुक्त खाते उघडण्याची परवानगी देते. एक पालक देखील अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने खाते उघडू शकतो. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचे मूल देखील आपले खाते उघडू शकते.

मर्यादा काय आहे: इंडिया पोस्ट वेबसाइटनुसार मासिक ठेवीची किमान रक्कम केवळ 100 रुपये आहे, कोणतीही कमाल मर्यादा नाही.

खाते बंद करणे आणि वाढवणे

3 वर्षांच्या सतत ठेवीनंतर खाते मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते. मात्र व्याज दर हा बचत खात्याप्रमाणेच असेल. हा कालावधी आणखी 5 वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lairai Jatra: लईराई देवीचा जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा; भाविकांचा लोटला महापूर

Netravali: कदंबच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करणार : वनमंत्री राणे

Yellow Alert In Goa: गोव्यात दोन दिवस यलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Mukesh Ambani: मुकेश अंबानी लवकरच करणार 150 अब्ज डॉलर्सच्या मार्केटमध्ये एन्ट्री? ‘या’ क्षेत्रात आजमावणार हात

गोव्यात लवकरच AI द्वारे होणार फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी, आरोग्य मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT