Samsung Fires 800 US Employees  Dainnik Gomantak
अर्थविश्व

Samsung Layoff 2026: टेक जगतात खळबळ! सॅमसंगने 800 कर्मचाऱ्यांना दिला नारळ; मोबाईल अन् टीव्ही विभागातील कर्मचाऱ्यांना मोठा फटका

Samsung Fires 800 Employees US: जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'सॅमसंग'ने एक मोठा निर्णय घेतला. कंपनीने अमेरिकेतील आपल्या विविध कार्यालयांतून सुमारे 800 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले.

Manish Jadhav

Samsung Fires 800 Employees US: जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'सॅमसंग'ने एक मोठा निर्णय घेतला. कंपनीने अमेरिकेतील आपल्या विविध कार्यालयांतून सुमारे 800 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले. जर तुम्हाला वाटत असेल की ही कपात बाजारातील मंदीमुळे झाली असेल, तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. सॅमसंगने हा अत्यंत कडक आणि मोठा निर्णय आपल्या अमेरिकेतील मुख्य मुख्यालयाची पुनर्रचना आणि स्थलांतर करण्याच्या रणनीतीमुळे घेतला.

कंपनी सध्या आपल्या बिझनेस मॉडेलमध्ये अनेक मोठे अंतर्गत बदल करत असून, ही संपूर्ण कंपनीतील मंदीची कपात नसून एक धोरणात्मक निर्णय असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

सॅमसंग आपल्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स बिझनेसचे अमेरिकेतील मुख्यालय न्यू जर्सी येथून हलवून टेक्सासच्या प्लेनो शहरात शिफ्ट करत आहे. सर्व टीम्स एकाच छताखाली आल्यास कामात अधिक सुसूत्रता येईल आणि निर्णय जलद घेता येतील, असा कंपनीचा दावा आहे. एकीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे सॅमसंगचा सेमिकंडक्टर म्हणजे चिप बिझनेस वेगाने वाढत आहे, तर दुसरीकडे मोबाईल, टीव्ही आणि होम अप्लायन्सेस उत्पादनावरील खर्च प्रचंड वाढला आहे. याचसोबत बाजारात 'ॲपल' (Apple) आणि चीनी कंपन्यांकडून मिळणाऱ्या तगड्या स्पर्धेमुळे खर्च कमी करण्याचे मोठे आव्हान सॅमसंगसमोर उभे राहिले आहे.

या निर्णयाचा सर्वाधिक फटका कंपनीच्या मोबाईल, डिस्प्ले आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स विभागातील कर्मचाऱ्यांना बसला. रॉयटर्सच्या अहवालानुसार, न्यू जर्सी कार्यालयातील सुमारे 739 पदांवर याचा थेट परिणाम झाला असून, टेक्सासच्या प्लेनो कार्यालयातील जवळपास 100 कर्मचाऱ्यांनाही नारळ देण्यात आला. ज्या कर्मचाऱ्यांची नवीन व्यवस्थेत गरज आहे, त्यांना टेक्सासमध्ये शिफ्ट होण्याचा पर्याय दिला गेला होता. मात्र, ज्यांना नवीन ठिकाणी जाणे शक्य नव्हते किंवा ज्यांची पदेच आता रद्द झाली, त्यांना नाइलाजाने कंपनी सोडावी लागली.

टेक इंडस्ट्रीमध्ये सुरु असलेले कपातीचे हे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, याआधी मायक्रोसॉफ्ट आणि मेटानेही मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. आता या यादीत सॅमसंगचे नावही जोडले गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT