Samsung Galaxy S25 FE Dainik Gomantak
अर्थविश्व

Samsung Galaxy S25 FE: 50MP ट्रिपल कॅमेरा, 4900mAh बॅटरी... बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स! सॅमसंगचा नवा फोन लाँच, किंमत जाणून घ्या

Samsung Galaxy S25 FE Launched In India: सॅमसंगने भारतात आपला नवा गॅलेक्सी एस२५ एफई (Fan Edition) स्मार्टफोन लाँच करताना प्रीमियम सेगमेंटमध्ये ग्राहकांसाठी परवडणारा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

Sameer Amunekar

सॅमसंगने भारतात आपला नवा गॅलेक्सी एस२५ एफई (Fan Edition) स्मार्टफोन लाँच करताना प्रीमियम सेगमेंटमध्ये ग्राहकांसाठी परवडणारा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. काही दिवसांपूर्वी जागतिक स्तरावर सादर झालेला हा स्मार्टफोन आता भारतीय बाजारात अधिकृतपणे उपलब्ध झाला आहे.

गॅलेक्सी एस२५ मालिकेतील हा फोन सॅमसंगच्या इन-हाऊस Exynos 2400 चिपसेटवर चालतो. यामध्ये ४९००mAh बॅटरी, ५० मेगापिक्सेलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि १२ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १६ वर आधारित OneUI 8 वर चालतो आणि कंपनीने या मॉडेलसाठी ७ वर्षांचे सॉफ्टवेअर अपडेट्स उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं आहे.

किंमत आणि व्हेरिएंट्स

सॅमसंगने गॅलेक्सी एस२५ एफईचे तीन स्टोरेज व्हेरिएंट्स सादर केले आहेत:

  • ८GB + १२८GB – ₹५९,९९९

  • ८GB + २५६GB – ₹६५,९९९

  • ८GB + ५१२GB – ₹७७,९९९

लाँच ऑफर अंतर्गत ५१२GB व्हेरिएंट २५६GB च्या किंमतीत उपलब्ध करून दिला जात आहे. तसेच, खरेदीदारांना ₹५,००० कॅशबॅक आणि २४ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआयचा लाभ मिळणार आहे.

गॅलेक्सी एस२५ एफईची विक्री २९ सप्टेंबरपासून सुरू होईल. हा स्मार्टफोन Samsung India ची अधिकृत वेबसाइट, ऑफलाइन स्टोअर्स, तसेच पार्टनर रिटेल व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असेल. ग्राहकांना हा फोन नेव्ही, जेटब्लॅक आणि व्हाईट या रंगांमध्ये मिळणार आहे.

डिस्प्ले आणि डिझाईन

फोनमध्ये ६.७-इंचाचा Full HD+ Dynamic AMOLED 2X डिस्प्ले दिला असून, यात १२०Hz रिफ्रेश रेट, १९०० निट्स ब्राइटनेस, Vision Booster टेक्नॉलॉजी आणि Gorilla Glass Victus+ प्रोटेक्शनचा समावेश आहे. याशिवाय, फोनची बॉडी Armour Aluminium फ्रेमसह अधिक मजबूत करण्यात आली आहे.

कॅमेरा फीचर्स

गॅलेक्सी एस२५ एफईमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे:

  • ५०MP प्रायमरी सेन्सर

  • ८MP टेलिफोटो सेन्सर

  • १२MP अल्ट्रावाइड लेन्स

फ्रंटसाठी १२MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे, जो एआय फिचर्ससह उच्च दर्जाचे फोटो आणि व्हिडिओ देतो.

परफॉर्मन्स आणि कनेक्टिव्हिटी

हा स्मार्टफोन Exynos 2400 प्रोसेसर, ८GB RAM, व विविध स्टोरेज पर्यायांसह येतो. बॅटरीसाठी यात ४९००mAh क्षमतेची युनिट असून, ती ४५W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि १५W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने या फोनमध्ये ५G, ४G LTE, Wi-Fi 6E, Bluetooth 5.4, GPS आणि USB Type-C सपोर्ट उपलब्ध आहे.

एआय फीचर

गॅलेक्सी एस२५ एफईमध्ये Google चे Circle to Search, Gemini Live यांसारखी एआय फिचर्स दिली आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांचा स्मार्टफोन अनुभव अधिक आकर्षक होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: मोडसाय - बड्डे येथे घरातूनच चालायचा 'ड्रग्स'चा धंदा; गांजासह पोलिसांनी जप्त केली Airgun

GCA Election: रोहन गटाचा 'त्रिफळा'; चेतन-बाळूचा विजयी 'षटकार'; परिवर्तन गटाचा 6-0 फरकानं उडाला धुव्वा, पाटणेकरांचाही पराभव

Operation Sindoor: भारताने अमेरिकेचा मध्यस्थीचा प्रस्ताव धुडकावून लावला... 'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्याचा मोठा खुलासा VIDEO

'ओंकार' परतून गोंयात आयलो रे..! फकीर पाटो येथे केळीच्या बागेचे केले नुकसान; कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी

Goa Tourism: पर्यटन मंत्री खंवटे म्हणतात, 'टॅक्सी व्यावसायिकांना माफिया म्हणू नका'; गोवा आणि 'व्हिएतनाम'मधील पर्यटनाचा फरकही केला स्पष्ट

SCROLL FOR NEXT