Goa Politics: 'अशी मीटिंग झालीच नाही'! तवडकरांच्या विषयावरून प्रदेशाध्‍यक्षांचे कानावर हात; भाजप नेत्यांची सावध प्रतिक्रिया

Ramesh Tawadkar: ‘मिळालेल्‍या खात्‍यांत ‘दम’ नाही; तवडकर उद्विग्‍न’, अशी बातमी ‘गोमन्‍तक’मध्‍ये प्रसिद्ध होताच प्रदेश भाजपात खळबळ माजली. खात्‍यांवरून तीव्र नाराजी व्‍यक्त केली.
Damu Naik, Ramesh Tawadkar
Damu Naik, Ramesh TawadkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘मिळालेल्‍या खात्‍यांत ‘दम’ नाही; तवडकर उद्विग्‍न’, अशी बातमी ‘गोमन्‍तक’मध्‍ये प्रसिद्ध होताच प्रदेश भाजपात खळबळ माजली. प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी तर ‘अशाप्रकारची बैठक झालीच नाही’, असे म्‍हणत या विषयावरून लक्ष हटवण्‍याचे प्रयत्‍न सोमवारी पणजीत घेतलेल्‍या पत्रकार परिषदेदरम्‍यान केले.

तीन दिवसांपूर्वी भाजपच्‍या वरिष्‍ठ ज्‍येष्‍ठ नेत्‍यांची पणजीत बैठक झाली. बैठकीला मंत्री तवडकर यांचीही उपस्‍थिती होती. बैठकीत बोलताना तवडकर यांनी आपल्‍याला देण्‍यात आलेल्‍या कला व संस्‍कृती तसेच क्रीडा या खात्‍यांवरून तीव्र नाराजी व्‍यक्त केली.

क्रीडा खात्‍याचे कोट्यवधींची देणी आहेत. या दोन खात्‍यांमध्‍ये अजिबात दम नाही, असे म्‍हणत त्‍यांनी प्रसंगी मंत्रिपदाचा राजीनामाही देण्‍याची तयारी ज्‍येष्‍ठ नेत्‍यांसमोर दर्शवली. त्‍यामुळे त्‍यांच्‍याकडूनही आश्‍‍चर्य व्‍यक्त करण्‍यात आले. भाजपने या बैठकीबाबत कमालीची गुप्‍तता बाळगल्‍याचेही वृत्तात नमूद करण्‍यात आले होते.

Damu Naik, Ramesh Tawadkar
Ramesh Tawadkar: 'दिलेल्या खात्‍यांमध्‍ये दम नाही', मंत्री तवडकर उद्विग्‍न; दर्शवली राजीनामा देण्‍याची तयारी

याबाबत पत्रकारांनी सोमवारी प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांना विचारले असता, त्‍यांनी वृत्ताचे खंडन केले. प्रदेशाध्‍यक्ष या नात्‍याने मलाच अशा बैठकीबाबत काहीही माहिती नाही, असे म्‍हणत त्‍यांनी कानावर हात ठेवणे पसंत केले.

Damu Naik, Ramesh Tawadkar
Goa Politics: फोंड्यात राजकीय घडामोडींना वेग! 'भाजप'मध्ये वाढला अंतर्गत संघर्ष; रवींच्या वाढदिनाकडे सर्वांच्या नजरा

दरम्‍यान, याबाबत सोमवारी मंत्री रमेश तवडकर यांच्‍याशी संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला असता, तो होऊ शकला नाही. तर अन्‍य भाजप नेत्‍यांनी कानावर हात ठेवणे पसंत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com