Samsung Galaxy M56 5G Dainik Gomantak
अर्थविश्व

सॅमसंगचा मोठा धमाका! AI फीचर्स अन् 50 MP कॅमेऱ्यासह Samsung Galaxy M56 5G लॉन्च; Vivo-Realme चं वाढलं टेन्शन!

Samsung Galaxy M56 5G: स्मार्टफोनच्या वैशिष्ट्याबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 50 मेगापिक्सेल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, एआय फीचर्स, 6 ओएस अपग्रेड्स आणि 6 वर्षांसाठी सुरक्षा अपडेट्ससह लॉन्च करण्यात आला आहे.

Manish Jadhav

सॅमसंगने पुन्हा एकदा मोठा धमाका केला आहे. मोबाईल प्रेमींसाठी सॅमसंगने त्यांच्या एम सीरीजमधील एक नवीन स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एम56 5जी लॉन्च केला. या शानदार स्मार्टफोनच्या वैशिष्ट्याबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 50 मेगापिक्सेल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, एआय फीचर्स, 6 ओएस अपग्रेड्स आणि 6 वर्षांसाठी सुरक्षा अपडेट्ससह लॉन्च करण्यात आला आहे. चला तर मग या फोनची किंमत, विक्री तारीख, लॉन्चिंग ऑफर्स आणि उपलब्ध असलेल्या सर्व फीचर्सबाबत जाणून घेऊया...

Samsung Galaxy M56 5G Specifications

डिस्प्ले: या फोनमध्ये 6.73 इंचाचा फुल एचडी प्लस एस एमोलेड प्लस डिस्प्ले आहे, जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

प्रोसेसर: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या फोनमध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे, सध्या कंपनीने चिपसेटबद्दल माहिती दिलेली नाही.

कॅमेरा सेटअप: या नवीन 5G फोनच्या पाठिमागच्या बाजूस 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा सेन्सर आहे. सेल्फीसाठी एचडीआर सपोर्टसह 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर असेल. या फोनमध्ये ऑब्जेक्ट इरेजर, इमेज क्लिपर सारखे एआय फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

बॅटरी क्षमता: 45 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 एमएएचची शक्तिशाली बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy M56 5G Price in India

या नवीन सॅमसंग स्मार्टफोनची किंमत 27,999 रुपये आहे. या किमतीत तुम्हाला 8 जीबी रॅम / 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट मिळेल. या फोनची विक्री 23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता कंपनीच्या अधिकृत साइट आणि अमेझॉनवर (Amazon) सुरु होणार आहे. लॉन्च ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, फोन खरेदी करताना तुम्हाला HDFC बँक क्रेडिट कार्ड/डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 3,000 रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटचा फायदा मिळेल.

स्पर्धा

किमतीच्या बाबतीत सॅमसंग कंपनीचा हा 5जी स्मार्टफोन या किंमत श्रेणीतील Vivo T3 Pro 5G, Nothing Phone (3a) आणि Realme 13 Pro Plus 5G सारख्या फोनशी थेट स्पर्धा करेल. हे तिन्ही फोन 25,000 ते 30,000 रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT