चीनची चाल! Apple ला मोठा झटका; Samsung बनला टॉप स्मार्टफोन ब्रँड

Samsung Beat Apple: जगातील अव्वल स्मार्टफोन ब्रँडचा मुकुट ॲपलकडून हिरावून घेण्यात आला आहे. सॅमसंगने ॲपलला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले.
Samsung Display Change Scheme
Samsung Display Change Scheme Dainik Gomantak
Published on
Updated on

Samsung Beat Apple: जगातील अव्वल स्मार्टफोन ब्रँडचा मुकुट ॲपलकडून हिरावून घेण्यात आला आहे. सॅमसंगने ॲपलला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले. मार्केट रिसर्च फर्म IDC च्या अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत आयफोन शिपमेंटमध्ये 10 टक्के घट झाली आहे. आयफोनच्या विक्रीत घट अशावेळी दिसून आली आहे, जेव्हा जागतिक बाजारात तेजी आली आहे. जागतिक स्मार्टफोन शिपमेंट 7.8 टक्क्यांनी वाढून 289.4 दशलक्ष झाले.

टॉप स्मार्टफोन ब्रँड कोणता होता?

दरम्यान, सॅमसंगने पुन्हा 20.8 टक्के मार्केट शेअरसह अव्वल स्थान पटकावले आहे. असे मानले जाते की, नवीन Galaxy S24 सीरिज लॉन्च झाल्यामुळे, Samsung स्मार्टफोनच्या विक्रीत वाढ नोंदवली गेली आहे, ज्याचा फायदा सॅमसंगला झाला आहे. ॲपल आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या काळात ॲपलचा मार्केट शेअर 17.3 टक्के राहिला आहे. Xiaomi आणि Samsung सारख्या चिनी स्मार्टफोन ब्रँड्सला मोठा फायदा झाला आहे. Xiaomi 14.1 टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Samsung Display Change Scheme
Indri: 'इंद्री'चा जगाभरात डंका! सिंगल माल्ट ब्रँडची दुसऱ्याच वर्षी एक लाखाहून अधिक बॉक्सची विक्री

कोणाचा किती मार्केट शेअर होता?

ॲपल- 20. 8 टक्के

सॅमसंग - 17.3 टक्के

Xiaomi - 14.1 टक्के

Samsung Display Change Scheme
Byju Layoffs: बायजूवर आर्थिक संकट, कोणतही कारण न देता कर्मचाऱ्यांना नारळ देण्यास सुरुवात; रिपोर्ट

चीनमध्ये आयफोनची विक्री कमी झाली

दरम्यान, आयफोनच्या विक्रीत घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे चीन, जिथे गेल्या वर्षभरात आयफोनच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. वास्तविक, चीन आयफोनच्या तुलनेत स्थानिक स्मार्टफोन ब्रँड्सना प्रमोट करत आहे. तसेच, सरकारी अधिकाऱ्यांच्या आयफोन वापरण्यावर बंदी आहे. दुसरीकडे, आयफोनच्या विक्रीबद्दल बोलायचे झाल्यास Apple च्या प्रीमियम iPhone 15 Pro मॉडेलची सर्वाधिक विक्री झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com