Sahara India Group Dainik Gomantak
अर्थविश्व

Sahara Refund Portal: दहा कोटी गुंतवणुकदारांसाठी आनंदाचा दिवस! 'सहारा'मध्ये अडकलेले पैसे माघारी मिळणार; अशी आहे प्रोसेस

Sahara India Group: या पोर्टलद्वारे, ज्या गुंतवणूकदारांचा गुंतवणूक कालावधी पूर्ण झाला आहे, त्यांना पैसे परत केले जातील.

Ashutosh Masgaunde

Sahara Refund Portal Launch: सहारामध्ये गुंतवणूक केलेल्या 10 कोटी गुंतवणूकदारांना आज मोठी बातमी मिळणार आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह 18 जुलै म्हणजेच मंगळवारी सहारा रिफंड पोर्टल लाँच करणार आहेत.

या पोर्टलद्वारे सहारामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळतील. या रिफंड पोर्टलद्वारे, ज्या गुंतवणुकदारांचा गुंतवणूक कालावधी पूर्ण झाली आहे त्यांना रक्कम परत केली जाईल.

गुंतवणुकीच्या पैशाच्या परताव्याशी संबंधित सर्व माहिती रिफंड पोर्टलवर उपलब्ध असेल.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही कारवाई होताना दिसत आहे. सहारा इंडियामध्ये देशभरातील लाखो गुंतवणूकदारांचे करोडो रुपये अडकले आहेत.

लोक त्यांच्या गुंतवणुकीची रक्कम परत मिळण्याची वाट पाहत आहेत. सहारा इंडियामधील गुंतवणुकीची मुदत पूर्ण झाल्यानंतरही लोकांना त्यांचे पैसे परत मिळालेले नाहीत.

सहकार मंत्रालयाकडून अर्ज

सहारा समूहाच्या, सहारा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सहारायन युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी, हमारा इंडिया क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि स्टार्स मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्याकडे पैसे जमा करणाऱ्या गुंतवणूकदारांना दिलासा देण्यासाठी सहकार मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ५ हजार कोटी रुपये सीआरसीएसकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते.

पैसे परत मिळवण्याची प्रोसेस

ज्या गुंतवणूकदारांनी सहारामध्ये पैसे गुंतवले आहेत, त्यांनी सर्वप्रथम त्यांचे पैसे कोणत्या सहकारी संस्थेत गुंतवले आहेत हे तपासावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला तुमच्याशी संबंधित सर्व कागदपत्रे गोळा करावी लागतील. या प्रक्रियेत सहाराच्या एजंटची भूमिका काय असेल. याबाबतची माहिती पोर्टलवर उपलब्ध असेल.

सरकारच्या या पावलामुळे गुंतवणूकदारांमध्ये पैसे परत मिळण्याची अपेक्षा निर्माण होणार आहे. सहारा-सेबी फंडात 24,000 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. हा निधी २०१२ मध्ये स्थापन करण्यात आला.

उत्तर भारतातील गुंतवणुकदारांचे जास्त पैसे अडकले

सहारा इंडियामध्ये बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील सर्वाधिक गुंतवणूकदार आहेत.

काही लोकांनी आपले कष्टाचे पैसे सहारा इंडियामध्ये जमा केले होते. आता ते घरोघरी फिरत आहेत.

गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण होऊनही पैसे परत न मिळाल्याने अनेक राज्यांमध्ये सहारा इंडियाविरोधात गुंतवणूकदारांचा रोष वाढत आहे.

2009 मध्ये सुरू झाला वाद

सहाराचा हा वाद 2009 चा आहे. जेव्हा सहाराच्या दोन कंपन्या सहारा हाउसिंग कॉर्पोरेशन लिमिटेड आणि सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशनने त्यांचा आयपीओ आणण्याची ऑफर दिली.

आयपीओ येताच सहाराच्या चुकांची गुपिते उघड होऊ लागली. सहाराने चुकीच्या पद्धतीने २४,००० कोटी रुपये उभे केल्याचे सेबीच्या निदर्शनास आले. यानंतर जेव्हा तपास सुरू झाला तेव्हा सेबीला अनियमितता आढळून आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT