Income Tax Dainik Gomanntak
अर्थविश्व

उद्यापासून बदलणार आयकर विभागाचे नियम, क्रिप्टोकरन्सीवर TDS लागू होणार

1 जुलै 2022 पासून आयकराशी संबंधित तीन नियम बदलले आहेत.

दैनिक गोमन्तक

New Income Tax Rule: आज जून महिना संपणार असून उद्या जुलै महिना लागमार आहे. तेव्हा आयकर विभागाचे काही नविननियमम सुद्धा या महिन्यापासून लागू होणार आहे. या महिन्यात एकाच वेळी अनेक नवीन आयकर नियम लागू होणार आहेत, ज्याचा परिणाम करदात्यांवर होणार आहे आणि आगामी काळात आणखी कर भरावा लागण्याची शक्यता आहे. 1 जुलै 2022 पासून आयकराशी संबंधित तीन नियम बदलले आहेत.

क्रिप्टोकरंन्सीवर TDS

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता (VDAs) म्हणजेच क्रिप्टोकरन्सी आणि नॉन फंगीबल टोकन्स (NFTs) च्या हस्तांतरणावर केलेल्या पेमेंटवर 1 टक्के TDS लादण्याची घोषणा केली होती. 10,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर 1% TDS लागू होईल, जो शुक्रवार, 1 जुलै 2022 पासून लागू होणार आहे. क्रिप्टोकरन्सी हस्तांतरित करताना खरेदीदाराकडे पॅन नसल्यास, 20 टक्के दराने कर भरावा लागेल. आणि जर खरेदीदाराने आयकर रिटर्न भरला नसेल तर 5 टक्के दराने टीडीएस भरावा लागेल.

1 जुलै, 2022 पासून, सर्व क्रिप्टो व्यवहारांवर TDS भरावा लागेल. तुम्हाला नफा झाला असो किंवा तोटा तुम्हाला हा कर भरावाच लागणार आहे. 2022-23 पासून, क्रिप्टोकरन्सीजमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30% भांडवली नफा कर आकारण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला आहे जो उद्यापासून लागू होणार आहे. जे गुंतवणूकदार क्रिप्टोकरन्सी नफ्यासाठी विकत नाहीत त्यांना देखील कर भरावा लागेल. अशा क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना एक टक्का टीडीएस भरावा लागेल जेणेकरून सरकार क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करणाऱ्यांचा नेमका ठावठिकाणा लागणार हे नक्की.

1 जुलै 2022 पासून सोशल मीडियावर Influencers आणि डॉक्टरांसाठी नवीन TDS नियम तयार करण्यात आला आहे. त्यांना 10 टक्के TDS भरावा लागेल. विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीकडून लाभ मिळवणाऱ्या डॉक्टर आणि सोशल मीडियावर Influencersना 10 टक्के TDS भरावा लागेल. CBDT नुसार, 20,000 रुपयांपेक्षा जास्त वस्तूच्या रूपात कोणताही नफा किंवा लाभ मिळाल्यावर, हा लाभ देणाऱ्या व्यक्तीला तो वजा केल्यावर 10% TDS भरावा लागेल. जर नफ्याचे मूल्य 20,000 रुपयांपेक्षा कमी असेल, तर टीडीएस भरावा लागणार नाही.

आधार-पॅन लिंकवर दुहेरी दंड

1 जुलै 2022 पासून, पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी दुप्पट दंड भरावा लागेल. वास्तविक, 1 एप्रिल 2022 पासून आधारला पॅन क्रमांकाशी जोडण्यासाठी 500 रुपये दंड भरावा लागत होता. परंतु CBDT च्या आदेशानुसार, जर तुम्ही 30 जून 2022 पर्यंत लिंक केले नाही तर तुम्हाला 1 जुलैपासून 1,000 रुपये दंड भरावा लागेल. CBDT ने म्हटले आहे की करदात्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना ही सुविधा देण्यात येत आहे की ते 31 मार्च 2023 पर्यंत आधार कार्ड पॅनशी लिंक करू शकतात. मात्र, दंड भरावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT