Mukesh Ambani
Mukesh Ambani Dainik Gomantak

रिलायन्स इंडस्ट्रीज मुलांमध्ये विभागण्यास मुकेश अंबानी यांनी केली सुरुवात

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पहिल्यांदाच मुकेश अंबानी निवृत्तीची तयारी करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले मुकेश अंबानी वीस वर्षांपासून रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख आहेत. 2002 मध्ये वडील धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर, भारतातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स समूहाची कमान मुकेश अंबानी यांच्या हातात आली.

Mukesh Ambani
मोदी सरकारचा ट्विटरला इशारा, 4 जुलैपर्यंत सर्व नियम पाळा, 'अन्यथा...'

त्यांच्या नेतृत्वाखाली, रिलायन्स इंडस्ट्रीजने पारंपारिक व्यवसायाव्यतिरिक्त रिटेल आणि टेलिकॉम सारख्या क्षेत्रांमध्ये यश मिळवले. मुकेश अंबानी आता 65 वर्षांचे असल्याने ते आता रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्यावसायिक साम्राज्य तीन मुलांमध्ये विभागण्याचा गंभीरपणे विचार करत आहेत.

वारसाहक्क सोपवायला सुरुवात झाली
गेल्या वर्षी रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित फॅमिली डे फंक्शनमध्ये त्यांनी याचे स्पष्ट संकेत दिले होते. मुकेश अंबानी या कार्यक्रमात म्हणाले होते की, आता नवी पिढी नेतृत्वाची जबाबदारी पेलण्यासाठी तयार आहे. आपण त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे, त्यांना सक्षम केले पाहिजे आणि प्रोत्साहित केले पाहिजे. आता त्यांनीही या दिशेने पुढाकार घेतला आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओचे अध्यक्षपद सोडले असून त्यांची जागा मोठा मुलगा आकाश अंबानीला देण्यात आली आहे.

Mukesh Ambani
गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

तिन्ही मुलांना समान वाटा मिळेल
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पहिल्यांदाच मुकेश अंबानी निवृत्तीची तयारी करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या (मुकेश अंबानी उत्तराधिकार योजना). नंतर ब्लूमबर्गनेही एका विशेष अहवालात अशीच माहिती दिली. मग तेलापासून ते किरकोळ व्यापारापर्यंतच्या अफाट व्यापार साम्राज्याची विभागणी कशी करायची आणि कोणावर कोणती जबाबदारी द्यायची हे ठरवण्यासाठी कौटुंबिक परिषद स्थापन करण्याची योजना असल्याचे बोलले जात होते. तीन मुलांपैकी प्रत्येकाला समान वाटा आणि प्रतिनिधित्व मिळावे, अशी जबाबदारी परिषदेला मिळणार आहे. रिलायन्सने तेव्हा या वृत्तांचे खंडन केले असले तरी, एक दिवसापूर्वीच्या हालचालीवरून असे दिसून येते की मुकेश अंबानी त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com