GST Dainik Gomantak
अर्थविश्व

Rules Change: GST च्या नियमांपासून ते एटीएम व्यवहारापर्यंत, 1 मेपासून बदलणार 'हे' नियम!

Rules Change: एलपीजी सिलिंडरच्या किंमतीतील बदलापासून वस्तू आणि सेवा कराच्या नियमांमध्येही अनेक बदल होणार आहेत.

Manish Jadhav

Rules Changing From 1st May 2023: प्रत्येक महिना नवीन बदल घेऊन येतो. महिन्याच्या सुरुवातीला गॅस, सीएनजी, पीएनजीच्या किमतींपासून अनेक नियमांमध्ये बदल केले जातात.

एक नागरिक म्हणून तुम्हाला या बदलांची माहिती असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, 1 मे 2023 देखील अनेक नवीन बदल घेऊन येत आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या होणार आहे.

एलपीजी सिलिंडरच्या किंमतीतील बदलापासून वस्तू आणि सेवा कराच्या नियमांमध्येही अनेक बदल होणार आहेत.

याशिवाय, म्युच्युअल फंड आणि एटीएम कार्डद्वारे व्यवहारांशी संबंधित नियमांमध्येही बदल होणार आहेत. अशा परिस्थितीत, 1 मे पासून बदल होणार्‍या या नियमांबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

या एपिसोडमध्ये आज आम्ही तुम्हाला त्या प्रमुख बदलांबद्दल सांगणार आहोत, जे 1 मे पासून लागू होणार आहेत. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया -

जीएसटी नियमांमध्ये बदल

1 मेपासून जीएसटी (GST) नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. नवीन नियमांनुसार, 1 मे पासून, 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांना सात दिवसांच्या आत इनव्हॉइस नोंदणी पोर्टलवर व्यवहाराची पावती अपलोड करावी लागेल. ते आता अनिवार्य करण्यात आले आहे. यापूर्वी, याबाबत कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नव्हती.

गॅस सिलेंडर

मे महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल दिसू शकतात. गेल्या महिन्यात सरकारने 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरची (LPG Cylinder) किंमत 91.50 रुपयांनी कमी केली होती. अशा परिस्थितीत 1 मे रोजी एलपीजी सिलिंडरसह सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत बदल पाहायला मिळू शकतात.

एटीएम व्यवहार नियम

पंजाब नॅशनल बँकेने एटीएम कार्ड व्यवहारांबाबत नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हे बदललेले नियम 1 मे पासून लागू होणार आहेत.

या नियमानुसार एटीएममधून पैसे काढताना पीएनबी ग्राहकांच्या खात्यात पैसे नसल्यास व्यवहार अयशस्वी झाल्यानंतर, बँक GSAT जोडून 10 रुपये आकारेल. पंजाब नॅशनल बँकेने आपल्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

Viral Video: पैशांसाठी तरुणीला शिवीगाळ, MNS कार्यकर्ते आक्रमक; परप्रांतीय तरुणाला कार्यालयात बोलावून चोपलं

Gautam Gambhir Angry: "टेम्बा बावुमाची बॅटिंग पाहा..." टीम इंडियाच्या 'फ्लॉप शो'वर गंभीर भडकला; फलंदाजांच्या क्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह Watch Video

SCROLL FOR NEXT