1 जुलैपासून अनेक बदल झाले आहेत. हे बदल तुमच्या खिशाला भारी पडणार आहेत. 1 जुलै 2024 पासून क्रेडिट कार्डपासून बँक खात्यापर्यंत, सिमकार्डपासून ते LPG सिलिंडरपर्यंत अनेक मोठे बदल झाले आहेत. एवढेच नाही तर पैशाशी संबंधित आणखी अनेक बदल जुलैमध्येच अपेक्षित आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन जुलैमध्येच संपूर्ण अर्थसंकल्प सादर करणार असताना, आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदतही संपत आहे. आयटीआर फाइलिंग, म्युच्युअल फंड आणि क्रेडिट कार्डशी संबंधित अनेक बदल या महिन्यात होत आहेत.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने सिमकार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. ट्रायने सिमकार्ड पोर्टेबिलिटीचे नियम बदलले आहेत. सिमकार्ड पोर्टेबिलिटीचे नवीन नियम 1 जुलैपासून लागू झाले आहेत. ट्रायने मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीचे नियम पूर्वीपेक्षा अधिक कडक केले आहेत.
नवीन नियमानुसार, नंबर पोर्ट करण्यासाठी, वापरकर्त्याला प्रथम अर्ज सबमिट करावा लागेल, त्यानंतर मोबाइल नंबर वापरकर्त्यांना त्यांची ओळख आणि सर्व तपशील सत्यापित करावे लागतील. ओटीपीद्वारे नंबर पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध होईल.
नवीन नियमानुसार, सिमकार्ड घेताना वापरकर्त्यांना आवश्यक ओळखपत्रासह पत्त्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल. एवढेच नाही तर वापरकर्त्याला बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनही करावे लागणार आहे. ट्रायने यासाठी लॉकिंग कालावधी सात दिवसांनी वाढवला आहे.
जुलै महिन्यात मोबाईल रिचार्ज महाग झाला आहे. तुम्हाला आता मोबाईल रिचार्ज करण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतील. रिलायन्स जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलने त्यांचे दर वाढवले आहेत.
क्रेडिटकार्ड बिल भरण्याचे नवीन नियम 1 जुलैपासून लागू झाले आहेत. आरबीआयच्या नवीन नियमांनुसार, सर्व बँकांना भारत बिल पेमेंट सिस्टमद्वारे क्रेडिट कार्ड पेमेंट करावे लागेल. या यादीत एचडीएफसी, आयसीआयसीआयसारख्या अनेक बँका आहेत, ज्यांनी अद्याप या सूचनांचे पालन केलेले नाही. आत्तापर्यंत फक्त 8 बँकांनी BBPS वर बिल पेमेंट सक्रिय केले आहे. अशा परिस्थितीत ज्या बँकांनी अद्याप ते कार्यान्वित केले नाही, त्यांच्या ग्राहकांना (Customers) अडचणी येणार आहेत.
याशिवाय, 1 जुलैपासून SBI च्या अनेक क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड पॉइंट्स बंद होतील. त्याचवेळी, 1 जुलैपासून आयसीआयसीआय बँकेने वेगवेगळ्या क्रेडिट कार्डवरील सेवा शुल्कात बदल करुन त्यात वाढ केली आहे. बँकेने एमराल्ड प्रायव्हेट मेटल क्रेडिट कार्ड वगळता सर्व कार्डांसाठी कार्ड हस्तांतरण शुल्क 100 रुपयांवरुन 200 रुपये केले आहे.
30 जून रोजी पंजाब नॅशनलने ती बँक खाती बंद केली आहेत जी गेल्या तीन वर्षांपासून सक्रिय नाहीत आणि त्यांच्याकडे बँक शिल्लक नाही. अशी बँक खाती 1 जुलैपासून काम करणार नाहीत. बँकेने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, 30 एप्रिल 2024 पर्यंत, 3 वर्षांपेक्षा जास्त काळ वापरात असलेली खाती 1 जुलैपासून बंद केली जातील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.