EPF Withdrawal Rule Change: पीएफ खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलले; कोरोना काळात सुरु झालेली ‘ही’ सुविधा बंद

EPF Withdrawal Rule Change: नोकरदारांसाठी वृद्धापकाळात पेन्शन हाच सर्वात मोठा आधार असतो. दरमहा पगारातून काही रक्कम कापली जाते.
EPF |EPFO
EPF |EPFO Dainik Gomantak
Published on
Updated on

EPF Withdrawal Rule Change: नोकरदारांसाठी वृद्धापकाळात पेन्शन हाच सर्वात मोठा आधार असतो. दरमहा पगारातून काही रक्कम कापली जाते. निवृत्तीनंतर एकदमच मोठी रक्कम मिळते. मात्र आता, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ही रक्कम काढण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. EPFO ने EPF अ‍ॅडव्हान्स पैसे काढण्याच्या नियमात बदल केला आहे. EPFO ने तात्काळ प्रभावाने अ‍ॅडव्हान्स थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

पैसे काढण्याचे नियम बदलले

EPFO ने करोडो PF ग्राहकांसाठी मोठा बदल केला आहे. EPFO ने आता कोविड ॲडव्हान्स सुविधा बंद केली आहे. ही सुविधा कोरोना काळात सुरु करण्यात आली होती. कोरोना काळात EPFO ​​ने खातेदारांना त्यांच्या PF खात्यातून अ‍ॅडव्हान्स पैसे काढण्याची सुविधा दिली होती. जी आता बंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती 12 जून 2024 रोजी अधिसूचना जारी करुन देण्यात आली. अधिसूचनेनुसार, कोरोना महामारी आता राहिलेली नाही, त्यामुळे अ‍ॅडव्हान्स पैसे काढण्याची सेवा तात्काळ प्रभावाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

EPF |EPFO
EPFO Higher Pension Scheme: पेन्शनधारकांचे बल्ले-बल्ले, उद्यापासून 'या' लोकांना मिळणार पेन्शन; परिपत्रक जारी!

काय सुविधा होती

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या खातेदारांना कोविड काळात ॲडव्हान्स पैसे काढण्याची सुविधा देण्यात आली होती. लोकांना आर्थिक मदत मिळावी म्हणून ही सुविधा सुरु करण्यात आली होती. या सुविधेअंतर्गत, पीएफ भागधारक त्यांच्या पीएफ खात्यातून दोनदा पैसे काढू शकत होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत, भागधारकांना परत न करता येणारी ॲडव्हान्स रक्कम काढण्याची सुविधा मिळाली होती. यानंतर, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत, 31 मे 2021 रोजी पुन्हा एकदा ॲडव्हान्स पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली होती. महामारीच्या काळात दोन कोटींहून अधिक ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेतला होता.

EPF |EPFO
EPFO Pension: हायर पेन्शनवर मोदी सरकारची मोठी अपडेट, नोकरी करणाऱ्यांचे बल्ले-बल्ले!

तुम्ही पैसे कधी काढू शकता?

भागधारक त्यांच्या पीएफ खात्यातून ॲडव्हान्स पैसे काढू शकतात. तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढू शकता. घर किंवा जमीन खरेदी करणे, घराची दुरुस्ती करणे, गृहकर्जाची परतफेड करणे, तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे किंवा स्वतःचे लग्न, मुलांचे शिक्षण इत्यादी कोणत्याही गरजांसाठी तुम्ही पैसे काढू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com