Premium Train Dainik Gomantak
अर्थविश्व

प्रवाश्यांसाठी सुखद! प्रीमियम ट्रेनमध्ये मिळणार 10 रुपयांचा चहा, पण जेवनाच्या किमती वाढल्या

रेल्वेने आपल्या सर्व प्रीमियम गाड्यांमधील सर्व खाद्यपदार्थ आणि पेयांवर स्वतंत्रपणे 50 रुपयांचा सेवा कर माफ केला आहे.

दैनिक गोमन्तक

वाढत्या महागाईच्या काळात सामांन्यांसाठी दिलासा देणारी एक बातमी समोर येत आहे 20 रुपयांमध्ये मिळणारा चहा 70 रुपयांना देण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळात, रेल्वेने आपल्या सर्व प्रीमियम गाड्यांमधील सर्व खाद्यपदार्थ आणि पेयांवर स्वतंत्रपणे 50 रुपयांचा सेवा कर माफ केला आहे. (Rs 10 tea will be available in premium trains but food prices have gone up)

परंतु खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये आता सेवा शुल्काची भर पडली आहे. रेल्वे बोर्डाने आदेशामध्ये नमूद केले की, ऑन-बोर्ड केटरिंगचे सेवा शुल्क माफ करण्यात आले आहे. तुम्ही आगाऊ बुकिंग केले असेल किंवा ट्रेनमध्येच ऑर्डर केली असेल तरीही सर्व प्रवाशांसाठी चहा आणि कॉफीच्या किमती सारख्याच असणार आहेत मात्र त्यासाठी दरात कोणतीही वाढ केली जाणार नाही.

या प्रीमियम गाड्यांमध्ये, प्रवासादरम्यान स्नॅक्स, लंच किंवा डिनरची ऑर्डर दिल्यास, जेवणाच्या खर्चात 50 रुपये सेवा शुल्क जोडले जाणार आहेत. पूर्वी नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळच्या अल्पोपहाराचे दर 105 रुपये, 185 रुपये आणि 90 रुपये होते, तर प्रत्येक जेवणासोबत 50 रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येते होते. मात्र, आता या जेवणासाठी प्रवाशांना अनुक्रमे 155 रुपये, 235 रुपये आणि 140 रुपये मोजावे लागणार आहेत तर हे वाढलेले दर प्रवासादरम्यान जेवण ऑर्डर करणाऱ्या प्रवाशांसाठी असणार आहेत.

चहा-कॉफीवर होणार परिणाम

जर तुम्ही प्रीमियम ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान चहा किंवा कॉफीची ऑर्डर दिली असेल तर तुम्हाला 20 रुपयांचा चहा 70 रुपयांना मिळणार नाही. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व्हिस चार्ज हटवण्याचा फायदा फक्त चहा-कॉफी ऑर्डर केल्यावरच दिसून येणार आहे. परंतु बुकिंगशिवाय जेवण ऑर्डर करणाऱ्या प्रवाशांना सेवा शुल्क भरावे लागेल, जे त्यांच्या जेवणाच्या खर्चांमध्ये जोडण्यात येणार आहे.

वंदे भारत गाड्यांसाठी, प्रवासादरम्यान ज्या प्रवाशांनी जेवण सेवा बुक केली नाही, त्यांना न्याहारी/दुपारचे जेवण किंवा रात्रीचे/संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी तेवढीच रक्कम भरावी लागेल जेवढी सेवा शुल्क आकारण्यात येत होते. कारण ही वाढ फी म्हणून नव्हे तर खाद्यपदार्थाची किंमत म्हणून दाखवली जात आहे.

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) च्या पूर्वीच्या तरतुदीनुसार, एखाद्या व्यक्तीने त्याचे रेल्वे तिकीट बुक करताना जेवणासाठी बुकिंग केले नसेल, तर त्याला रुपये भरावे लागणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT