Netflixचा नवीन नियम भारतात लागू होणार? मित्रांना पासवर्ड देणं पडणार महागात

मित्रांकडून पासवर्ड मागून मोफत स्ट्रीमिंग करणाऱ्यांना नेटफ्लिक्स कंपनी आता लगाम घालणार आहे.
Netflix
Netflix Dainik Gomantak
Published on
Updated on

चित्रपट आणि सिरीज प्रमींसाठी ही महत्वाची बातमी आहे. मित्रांकडून पासवर्ड मागून मोफत स्ट्रीमिंग करणाऱ्यांना नेटफ्लिक्स कंपनी आता लगाम घालणार आहे. एकाच अकाउंटच्या जास्त युजर्समुळे नेटफ्लिक्सचे मोठे नुकसान झाले आहे. पण आता ते एक फीचर आणणार आहे ज्यामध्ये अतिरिक्त शुल्क भरल्यानंतरच इतरांना नेटफ्लिक्स पाहता येणार आहे. (Netflix Update News)

Netflix
UK PM Race: ब्रिटीश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक 118 मतांसह अव्वल

सध्या, कंपनी पाच लॅटिन अमेरिकन देशांमध्ये आपला हा प्रकल्प सुरू करत आहे. Netflix "Add a Home" फीचर आणत आहे तसेच पुढील महिन्यापासून अर्जेंटिना, डोमिनिकन रिपब्लिक, एल साल्वाडोर, ग्वाटेमाला आणि होंडुरासमध्ये हे फीचर लागू केले जाणार आहे.

अतिरिक्त वापरकर्तां जोडल्यानंतर कोणालाही ते कोणत्याही डिव्हाइसवरती पाहण्याची परवानगी देण्यात येते. रिपोर्ट्सनुसार, यासाठी पूर्ण सदस्यत्वापेक्षा थोडे कमी शुल्क द्यावे लागणार आहेत. मार्चच्या सुरुवातीला, कंपनीने चिली, कोस्टा रिका आणि पेरूमध्ये "अतिरिक्त सदस्य जोडा" (Add a Home) वैशिष्ट्य जोडले, जे वापरकर्त्यांना मासिक शुल्कासाठी त्यांच्या घराबाहेर नेटफ्लिक्स पाहण्याची परवानगी देत आहे.

Netflix च्या मते, त्यांचे वापरकर्ते त्यांची लॉगिन माहिती 100 दशलक्षाहून अधिक लोकांसोबत शेअर करतात जे यासाठी कोणतेही शुल्क भरत नाहीत आणि यापैकी 30 दशलक्षाहून अधिक अमेरिका आणि कॅनडामधील आहेत.

Netflix
Pakistani Rupee: डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाही गडगडला

"एकाहून अधिक पत्त्यांवर खाते सामायिकरणामुळे आमच्या दीर्घकालीन गुंतवणूक क्षमतेवर आणि सेवा सुधारण्याच्या क्षमतेवर याचा परिणाम होतो," नेटफ्लिक्समधील उत्पादन नवोपक्रमाचे संचालक चेंगी लाँग म्हणाले आहेत. आता नेटफ्लिक्सच्या पाच नवीन मार्केटमधील सदस्य दरमहा सुमारे $3 किंवा रु 140 देऊन स्ट्रीमिंगसाठी अतिरिक्त "घरे" जोडू शकणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com