RIL companies shares hits new record Reliance Market Cap cross 17 lakh cr  Dainik Gomantak
अर्थविश्व

रिलायन्सचा शेअर 2520 रुपयांवर, कंपनीचे मार्केट कॅप 17 लाख कोटींच्या पार

कंपनीचा शेअरची किंमत 1.5 टक्क्यांनी वाढून 2520 रुपयांच्या पुढे पोहोचली आहे . या तेजीमुळे कंपनीचे मार्केट कॅप (Reliance Market Cap) 17 लाख कोटी रुपयावर पोहचले आहे.

दैनिक गोमन्तक

शेअर बाजारात (Share Market) रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) शेअरमध्ये विक्रमी वाढ कायमच आहे. सोमवारी बाजारात कंपनीचा शेअरची (RIL शेअर) किंमत 1.5 टक्क्यांनी वाढून 2520 रुपयांच्या पुढे पोहोचली आहे . या तेजीमुळे कंपनीचे मार्केट कॅप (Reliance Market Cap) 17 लाख कोटी रुपयावर पोहचले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रिलायन्स असे करणारी देशातील पहिली कंपनी बनली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने कंपनीच्या नफ्यात आणखीन जोरदार वाढ होण्याची अपेक्षा आहे.(RIL companies shares hits new record Reliance Market Cap cross 17 lakh cr)

एस्कॉर्ट सिक्युरिटीचे रिसर्च हेड असिफ इक्बाल यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखतीत सांगितले की, 'शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण कच्च्या तेलाच्या किमती वाढणे आहे. अशा परिस्थितीत कंपनीच्या जीआरएममध्ये मजबूत वाढ होऊ शकते अशी अपेक्षा आहे. त्यामुळे कंपनीच्या नफ्यावर थेट परिणाम होईल. त्याचबरोबर नैसर्गिक वायूच्या किमती वाढत आहेत. 1 ऑक्टोबर रोजी किमती वाढवण्याबाबत सरकार निर्णय घेऊ शकते. तसेच, अराम्को करारावर लवकरच मोठी बातमी अपेक्षित आहे. या बातम्यांमुळे शेअरमध्ये तेजीचा कल आहे.'

सध्या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत वाढ दिसून येत आहे आणि ही वाढ थोड्या दिवसातच 2800 रुपयांपर्यंतही जाऊ शकतो.त्यामुळे कंपनीच्या प्रत्येक स्टॉकमध्ये खरेदीचा सल्ला दिला जाईल. कारण रिलायन्सचा स्टॉक 3,000 रुपयांवरदेखील जाण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टेनलीच्या अहवालानुसार रिलायन्स इंडस्ट्रीजला ओव्हरवेट रेटिंग देण्यात आले आहे. त्यांचे म्हणणे आहे की कंपनीने स्ट्रँड लाईफचे अधिग्रहण केल्याने डिजिटल आरोग्य व्यवसायात त्याची उपस्थिती वाढेल.

सध्या रिलायन्सचे मार्केट कॅप 17 लाख कोटी रुपयावर पोहचले आहे.आणि कंपनी मार्केटमध्ये सध्या एक नंबरवर आहे, त्यापाठोपाठ TCS 14 लाख कोटीसह दुसरया तर HDFC बँक 9 लाख कोटीसह कंपनी तिसऱ्या स्थानी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT