Share Market सोबतच FDI ही तेजीत, महिनाभरात 21,875 कोटींची गुंतवणूक

आकडेवारीनुसार, 1 ते 23 सप्टेंबर दरम्यान एफपीआयने 13,536 कोटी रुपये इक्विटीमध्ये आणि 8,339 कोटी रुपये कर्ज किंवा बाँड मार्केटमध्ये टाकले आहेत(FDI).
FDI: Foreign Portfolio Investors invest 21,875cr in India
FDI: Foreign Portfolio Investors invest 21,875cr in IndiaDainik Gomantak

परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) सप्टेंबरमध्ये भारतीय बाजारात 21,875 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे (FDI). भारतीय बाजारांवरील (Indian Market) एफपीआयचा हा दीर्घकालीन दृष्टिकोन सकारात्मक आहे. डिपॉझिटरी आकडेवारीनुसार, 1 ते 23 सप्टेंबर दरम्यान एफपीआयने 13,536 कोटी रुपये इक्विटीमध्ये आणि 8,339 कोटी रुपये कर्ज किंवा बाँड मार्केटमध्ये (Bond Market) टाकले आहेत. अशा प्रकारे देशात फक्त एका महिन्यात त्यांची गुंतवणूक 21,875 कोटी रुपये होती. तर ऑगस्ट महिन्याचा विचार करता भारतीय बाजारात एफपीआयची निव्वळ गुंतवणूक 16,459 कोटी रुपये इतकी होती. (FDI: Foreign Portfolio Investors invest 21,875cr in India)

मॉर्निंगस्टार या कंपनीचे इंडियाचे सहयोगी संचालक हिमांशू श्रीवास्तव म्हणाले की, भारतीय शेअर बाजारातील तेजी, बाजारातील दीर्घकालीन सकारात्मक दृष्टीकोन, भारतात असलेली आर्थिक पुनर्प्राप्तीची शक्यता आणि कॉर्पोरेट कमाईमध्ये सुधारणा यामुळे विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर्समध्ये गुंतवणूक करत आहेत. याशिवाय चीनमध्ये झालेल्या घसरणीचा भारतालाही फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे भारत हे एक दीर्घकालीन दृष्टीकोनातून परदेशी गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचे एक आकर्षक ठिकाण बनले आहे.

FDI: Foreign Portfolio Investors invest 21,875cr in India
देशाला जास्त नव्हे तर मोठ्या बँकांची गरज : अर्थमंत्री निर्मला सीतारामन

या आठवड्यात सेन्सेक्सच्या पहिल्या 10 कंपन्यांचे बाजार भांडवल म्हणजेच मार्केट कॅप 1,56,317.17 कोटी रुपयांनी वाढले आहे. या दरम्यान, सेन्सेक्सने प्रथमच विक्रमी 60,000 चा टप्पा देखील ओलांडला. गेल्या आठवड्यात बीएसईच्या 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1,032.58 वाढला होता. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल 58,671.55 कोटी रुपयांनी वाढून 15,74,052.03 कोटी रुपये झाले. गुरुवारी दिवसभराच्या व्यवहारात रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवलाने 16 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडले होते.

दरम्यान मागील आटवड्यातच गुंतवणूकदारांनी बाजारात विक्रमी वेगाने कमाई केली होती . अवघ्या अर्ध्या तासाच्या व्यवसायामध्ये त्यांची संपत्ती 2.50 लाख कोटी रुपयांहून अधिक वाढली होती. बुधवारी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 2,58,56,596.22 कोटी रुपये होते, जे 2,57,877.21 कोटी रुपयांनी वाढून आज 2,61,14,473.43 कोटी रुपये झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com