Retail Dainik Gomantak
अर्थविश्व

Retail Inflation: दिलासा, दिलासा! किरकोळ महागाई दर 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

Retail iinflation: महागाईच्या आघाडीवर सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. अन्नधान्याच्या किमती कमी झाल्याने किरकोळ चलनवाढीचा दर नोव्हेंबरमध्ये 11 महिन्यांच्या नीचांकी 5.88 टक्क्यांवर आला.

दैनिक गोमन्तक

Retail iinflation: महागाईच्या आघाडीवर सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. अन्नधान्याच्या किमती कमी झाल्याने किरकोळ चलनवाढीचा दर नोव्हेंबरमध्ये 11 महिन्यांच्या नीचांकी 5.88 टक्क्यांवर आला. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) ने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या कम्फर्ट झोनमध्ये किरकोळ चलनवाढीची 11 महिन्यांतील ही पहिलीच वेळ आहे.

गेल्या डिसेंबरमध्ये महागाई दर किती होता?

किरकोळ महागाई दर दोन ते सहा टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याची जबाबदारी आरबीआयवर आली आहे. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित किरकोळ महागाई ऑक्टोबर 2022 मध्ये 6.77 टक्के आणि गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 4.91 टक्के होती. NSO च्या आकडेवारीनुसार, अन्नधान्याचा महागाई (Inflation) दर मागील महिन्यात 7.01 टक्क्यांवरुन 4.67 टक्क्यांवर आला आहे.

तसेच, किरकोळ चलनवाढीचा दर जानेवारीपासून मध्यवर्ती बँकेच्या सहा टक्क्यांच्या मर्यादेच्या वर राहिला आहे. आता तो 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. डिसेंबर 2021 मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 5.66 टक्के होता. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी RBI ने गेल्या आठवड्यात रेपो रेट 0.35 टक्क्यांनी वाढवून 6.25 टक्के केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Karnataka Water Dispute: गोमंतकीयांचा पाण्याचा हक्क धोक्यात? म्हादईनंतर आता तिळारीवर नजर; गोव्याच्या पाण्यावर कर्नाटकच्या नव्या दाव्याची चाहूल

Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा निवृत्त होणार? BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्लांनी अफवांवर दिलं स्पष्ट उत्तर; 'हिटमॅन'बाबतचा संभ्रम दूर

Sonia Gandhi on Students Protest: 'विद्यार्थ्यांना शत्रू मानतं मोदी सरकार'! 'नीट' पेपरफुटीवरुन सोनिया गांधींचा हल्लाबोल

Pakistan Suicide Attack: पाकिस्तान पुन्हा रक्ताळला! खैबर पख्तूनख्वामध्ये भीषण आत्मघाती हल्ला; 12 सैनिकांसह 15 जण ठार 

Horoscope: एकादशीचा शुभ मुहूर्त! 'या' राशींचे नशीब उजळणार; आर्थिक लाभासह करिअरमध्ये यशाचे संकेत

SCROLL FOR NEXT