RBI Dainik Gomantak
अर्थविश्व

RBI Repo Rate: बँकेकडून कर्ज घेणाऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट, आरबीआयने केली पूर्ण तयारी!

Reserve Bank of India: जर तुम्ही होम लोन, कार लोन किंवा बँकेकडून कोणत्याही प्रकारचे लोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंदित करु शकते.

Manish Jadhav

Reserve Bank of India Repo Rate: जर तुम्ही होम लोन, कार लोन किंवा बँकेकडून कोणत्याही प्रकारचे लोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंदित करु शकते.

सलग तिसऱ्यांदा, आगामी द्वि-मासिक धोरण आढाव्यात RBI कडून व्याजदरात कोणताही बदल अपेक्षित नाही.

रेपो दर जुन्याच पातळीवर राहतील, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, यूएस फेडरल रिझर्व्ह आणि युरोपियन सेंट्रल बँकेच्या मुख्य दरांमध्ये वाढ होऊनही देशांतर्गत चलनवाढ आरबीआयच्या निर्धारित मर्यादेतच राहिली आहे.

रेपो दर 6.5 टक्के कायम आहे

दरम्यान, आरबीआयने गेल्या वर्षी मे महिन्यापासून व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली होती. मात्र, या वर्षी फेब्रुवारीपासून रेपो दर 6.5 टक्के राहिला आहे.

एप्रिल आणि जूनमधील शेवटच्या दोन द्वि-मासिक पॉलिसी आढाव्यात ते अपरिवर्तित राहिले.

RBI गव्हर्नर यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक 8-10 ऑगस्ट रोजी होणार आहे.

गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) 10 ऑगस्ट रोजी धोरणात्मक निर्णय जाहीर करतील.

महागाई दर 5 टक्क्यांच्या खाली आहे

बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस म्हणाले की, “आम्ही आरबीआयकडून दरांबाबत यथास्थिती कायम ठेवण्याची अपेक्षा करतो. याचे कारण सध्या महागाईचा दर 5 टक्क्यांच्या खाली आहे. मात्र येत्या काही महिन्यांत महागाई वाढल्याने त्यात काही प्रमाणात वाढ होण्याचा धोका आहे.

कोटक महिंद्रा बँकेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ उपासना भारद्वाज म्हणाल्या की, "2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या घोषणेनंतर तरलतेची स्थिती अनुकूल झाली असल्याने, आम्ही आरबीआयने सध्याच्या भूमिकेवर ठाम रहावे अशी अपेक्षा करतो."

उपासना भारद्वाज पुढे म्हणाल्या की, 'देशांतर्गत चलनवाढीकडे सर्वांचे लक्ष असेल.' आयसीआरएच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी सांगितले की, 'भाज्यांच्या किमती वाढल्यामुळे सीपीआय किंवा किरकोळ महागाई जुलै 2023 मध्ये 6 टक्क्यांच्या वर जाण्याची शक्यता आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT