Credit Card Dues: 5 टक्के लोकांनी खर्च केले 2 लाख कोटी; RBI चिंतेत, तर बॅंकर्स म्हणातायेत होऊ दे खर्च...

Credit Card: आरबीआयने वाढत्या असुरक्षित बँक क्रेडिटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. परंतु, बँकांचे म्हणणे आहे की एकूण कर्जाच्या तुलनेत त्याचा वाटा फारच कमी आहे.
Credit Card Dues
Credit Card DuesDainik Gomantak

Credit Card Dues Crossed 2 lakh crore:

क्रेडीट कार्डद्वारे पेमेंट करण्याचा ट्रेंड देशात झपाट्याने वाढत आहे. गेल्या वर्षभरात देशातील क्रेडिट कार्डची थकबाकी 30 टक्क्यांनी वाढली आहे. एकूण बँक कर्जाच्या तुलनेत हे जवळपास दुप्पट वाढले आहे. एप्रिलमध्ये क्रेडिट कार्डची थकबाकी 2 लाख कोटींच्या पुढे गेली आहे.

असे असले तरी बँकांचे म्हणणे आहे की, क्रेडिट कार्डच्या थकबाकीचा वाटा फारच कमी असल्याने काळजी करण्यासारखे काही नाही. मात्र, रिझर्व्ह बँकेने असुरक्षित बँक क्रेडिटमध्ये वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

RBI च्या मते, एप्रिल 2023 मध्ये क्रेडिट कार्डची थकबाकी 2,00,258 कोटींवर पोहोचली आहे, जी गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत 29.7 टक्के जास्त आहे. क्रेडिट कार्डची थकबाकी वाढली म्हणजे लोक कर्जात बुडाले आहेत. असे, क्रेडिट कार्डचा वाढता वापर दर्शवित आहे.

2008 च्या जागतिक आर्थिक मंदीपूर्वी क्रेडिट कार्डची थकबाकी 1.2 टक्क्यांवर गेली होती. त्यानंतर दशकभर ते एक टक्क्यांच्या खाली राहिली. ऑगस्ट 2019 मध्ये याने एक टक्‍क्‍यांचा टप्पा ओलांडला आणि तेव्हापासून त्यात सातत्याने वाढ होत आहे.

ग्राहकांकडून क्रेडिट कार्डचा वापर वाढल्याने ताळेबंदही वाढला आहे. गेल्या वर्षभरात ग्राहकांच्या खर्चात वाढ झाली आहे. एप्रिल 2023 मध्ये क्रेडिट कार्डद्वारे 1.3 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले. क्रेडिट कार्डचे व्यवहार वाढले याचा अर्थ ग्राहकांचा आत्मविश्वास वाढत आहे.
संजीव मोघे, अध्यक्ष अ‍ॅक्सिस बँक (कार्ड्स आणि पेमेंट्स)
Credit Card Dues
PM Modi Video: "देशात काय चालले आहे"?; परदेश दौऱ्यावरून परताच पीएम मोदींची नड्डा यांच्याकडे विचारपूस

पाच टक्क्यांपेक्षा कमी भारतीयांकडे क्रेडिट कार्ड

बँकर्स म्हणतात की, आजची परिस्थिती 2008 पेक्षा वेगळी आहे. आता क्रेडिट कार्ड फक्त अशा लोकांना दिले जाते जे कर्जाची परतफेड करण्यास सक्षम आहेत. वाढता खर्च आणि मल्टीकार्ड मालकी असूनही, भारत जगातील अशा देशांपैकी एक आहे जिथे फार कमी लोकांकडे क्रेडिट कार्ड आहेत.

Credit Card Dues
RBI On Economic Growth Rate: भारतीयांसाठी आनंदाची बातमी! RBI ने चालू आर्थिक वर्षासाठी...

लोकसंख्येचा विचार करता भारतातील पाच टक्क्यांहून कमी लोकांकडे क्रेडिट कार्ड आहे. हे इतर अनेक विकसनशील देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. RBI च्या म्हणण्यानुसार, गेल्या 12 महिन्यांत बँक क्रेडिटमध्ये उद्योगाचा हिस्सा 26.3 टक्क्यांवरून 24.3 टक्क्यांवर आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com