RBI Dainik Gomantak
अर्थविश्व

RBI चा मोठा निर्णय, 'या' बॅकेला ठोठावला लाखोंचा दंड; लाखो ग्राहकांना बसणार फटका!

Reserve Bank of India: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून बँकांबाबत वेळोवेळी अनेक मोठे निर्णय घेतले जातात.

Manish Jadhav

Reserve Bank of India: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून बँकांबाबत वेळोवेळी अनेक मोठे निर्णय घेतले जातात. आता आरबीआयने सेंट्रल बँक ऑफ इंडियाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले की, फसवणूक वर्गीकरण आणि अहवालाशी संबंधित नियमांच्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया (सीबीआय) वर 84.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेने 31 मार्च 2021 रोजी बँकेच्या आर्थिक स्थितीचे पर्यवेक्षी मूल्यांकन करण्यासाठी वैधानिक तपासणी केली होती.

अहवालाच्या छाननीतून असे समोर आले की, बँकेने जॉइंट फोरम ऑफ लेंडर्स (JFL) ची खाती 'फसवणूक' म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाच्या सात दिवसांच्या आत RBI ला फसवणूकीचा अहवाल दिला नाही.

बँकेने यापूर्वीही अनेक बँकांना दंड ठोठावला आहे

31 मार्च रोजी संपणाऱ्या 2022-23 या आर्थिक वर्षात RBI ने आठ सहकारी बँकांचे परवाने रद्द केले आहेत. नियमांचे पालन न केल्याने रिझर्व्ह बँकेने या बँकांवर (Bank) 114 वेळा दंडही ठोठावला आहे.

सहकारी बँकांच्या माध्यमातून ग्रामीण भागात बँकिंग सेवेचा झपाट्याने विस्तार झाला आहे. मात्र या बँकांमधील अनियमितता समोर आल्याने आरबीआयला (RBI) कठोर पावले उचलावी लागली.

या बँकांचे परवाने रद्द करण्यात आले

1. मुधोळ सहकारी बँक

2. मिलाथ को-ऑपरेटिव्ह बँक

3. श्री आनंद को-ऑपरेटिव्ह बँक

4. रुपी को-ऑपरेटिव्ह बँक

5. डेक्कन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक

6. लक्ष्मी सहकारी बँक

7. सेवा विकास सहकारी बँक

8. बाबाजी दाते महिला अर्बन बँक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT