PIL filed against RBI, SBI: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली. मंगळवारपासून (23 मे) नोटा परत घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान, भाजप नेते आणि अधिवक्ता अश्वनी उपाध्याय यांनी दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याच्या निर्णयाबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबत अश्वनी उपाध्याय यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
'कोणतीही डिमांड स्लिप आणि ओळखीच्या पुराव्याशिवाय 2000 च्या नोटा जमा करण्याचा आदेश हा तर्कहीन असून, भारतीय संविधानाच्या कलम 14 चे उल्लंघन करणारा आहे.' असे याचिकेत म्हटले आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाला निर्देश देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
तसेच, 2000 रुपयांच्या नोटा संबंधित बँक खात्यांमध्येच जमा कराव्यात, असे सांगण्यात आले आहे. यामुळे कोणीही इतर कोणाच्याही बँक खात्यांमध्ये पैसे जमा करू शकणार नाही. याद्वारे काळा पैसा आणि बेहिशोबी मालमत्ता असलेल्या लोकांची सहज ओळख होऊ शकते. असेही याचिकेत म्हटले आहे.
यामुळे नागरिकांचे मूलभूत अधिकार सुरक्षित करण्यासाठी काळा पैसा आणि बेहिशोबी मालमत्ताधारकांविरुद्ध योग्य कारवाई करण्यात केंद्राला मदत होईल. असे उपाध्याय म्हणाले आहेत. यासंदर्भात सरकार आणि आरबीआयला आवश्यक निर्देश देण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
RBI ने चलनातून बाहेर काढलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया मंगळवारपासून (23 मे 2023) सुरू होत आहे. संबंधित व्यक्ती कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन दोन हजार रुपयांच्या नोटा सहज बदलू शकतात. यासाठी कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही. तसेच तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र मागितले जाणार नाही. कोणतीही व्यक्ती एकावेळी दोन हजार रुपयांच्या 10 नोटा बदलू शकते. 2000 च्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बदलता येतील.
RBI ने गेल्या शुक्रवारी चलनातून काढून टाकलेल्या रु. 2,000 च्या नोटा बदलण्यासाठी कोणत्याही फॉर्मची आणि कोणत्याही ओळखपत्राची गरज नाही, असे देशातील सर्वात मोठी बँक SBI ने म्हटले आहे.
RBI ने FAQ जारी केले आहेत. चलनातून बाहेर काढण्यात आलेल्या 2000 च्या नोटा बदलण्याची प्रक्रिया 23 मे 2023 पासून सुरू होणार असून ती 30 सप्टेंबरपर्यंत बदलता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.