RBI Cancelled Bank License: रिझर्व्ह बँकेने 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात अनेक सहकारी बँकांचे परवाने रद्द केले आहेत. जर तुमचेही या बँकांमध्ये खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
या बँकांना रिझर्व्ह बँकेकडून (RBI) कडक कारवाईचा सामना करावा लागला आहे. बँकांचा परवाना रद्द करण्याबरोबरच आरबीआयने काही बँकांना मोठा दंडही ठोठावला आहे. आरबीआयच्या कारवाईचा सर्वाधिक फटका सहकारी बँकांना बसला आहे.
31 मार्च 2023 रोजी संपलेल्या 2022-23 या आर्थिक वर्षात अलीकडेच आठ सहकारी बँकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. नियमांचे पालन न केल्याने रिझर्व्ह बँकेने या बँकांवर 100 हून अधिक वेळा दंड ठोठावला आहे.
सहकारी बँकांच्या (Cooperative Banks) माध्यमातून ग्रामीण भागात बँकिंग सेवेचा झपाट्याने विस्तार झाला आहे. या बँकांमधील अनियमितता समोर आल्याने आरबीआयने कठोर पावले उचलली आहेत.
दुहेरी नियमन आणि कमकुवत वित्त यांव्यतिरिक्त सहकारी बँकांना स्थानिक नेत्यांच्या हस्तक्षेपाचा सामना करावा लागत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने कारवाई सुरु केली आहे.
गेल्या वर्षभरात आठ बँकांचे (Bank) परवाने रद्द करण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊया RBI ने कोणत्या बँकांचे परवाने रद्द केले?
1. मुधोळ सहकारी बँक
2. मिलाथ को-ऑपरेटिव्ह बँक
3. श्री आनंद को-ऑपरेटिव्ह बँक
4. रुपी को-ऑपरेटिव्ह बँक
5. डेक्कन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक
6. लक्ष्मी सहकारी बँक
7. सेवा विकास सहकारी बँक
8. बाबाजी दाते महिला अर्बन बँक
दुसरीकडे, अपुरे भांडवल, बँकिंग नियमांचे पालन न केल्यामुळे RBI ने वरील बँकांना परवाना दिला. भविष्यातील कमाईच्या क्षमतेच्या अभावासारख्या कारणांमुळे देखील परवाना रद्द केला.
गेल्या अनेक वर्षांपासून सहकारी बँकिंग क्षेत्रावर आरबीआयकडून देखरेख केली जात आहे. मध्यवर्ती बँकेने 2021-22 मध्ये 12 सहकारी बँकांचे, 2020-21 मध्ये 3 सहकारी बँकांचे आणि 2019-20 मध्ये दोन सहकारी बँकांचे परवाने रद्द केले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.