Mukesh Ambani  Dainik Gomantak
अर्थविश्व

Fashion Factory Exchange Festival: जुने कपडे द्या अन् ब्रँडेड कपडे घ्या...! मुकेश अंबानींचं मध्यमवर्गीयांना मोठं गिफ्ट; कसं ते जाणून घ्या

Reliance Clothes Exchange Scheme: मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स रिटेलने एक खास योजना आणली आहे. या नवीन योजनेचे नाव 'फॅशन फॅक्टरी एक्सचेंज फेस्टिव्हल' आहे.

Manish Jadhav

Reliance Retail Exchange Festival: जर तुमचे बहुतेक कपडे जुने झाले असतील आणि तुम्ही नवीन ब्रँडेड कपडे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. खरंतर, मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स रिटेलने एक खास योजना आणली आहे. या नवीन योजनेचे नाव 'फॅशन फॅक्टरी एक्सचेंज फेस्टिव्हल' आहे. या अंतर्गत, तुम्ही तुमचे जुने किंवा ब्रँड नसलेले कपडे एक्सचेंज करु शकता आणि आकर्षक सवलतीत नवीन ब्रँडेड कपडे खरेदी करु शकता. श्रावण महिना आणि येणाऱ्या सणांच्या मुहूर्तावर हा खास महोत्सव सुरु करण्यात आला आहे, जेणेकरुन ग्राहकांना सणांच्या निमित्ताने परवडणाऱ्या किमतीत नवीन कपडे खरेदी करता येतील.

ही ऑफर कुठे आणि कधीपर्यंत उपलब्ध असेल

दरम्यान, ही ऑफर देशभरातील सर्व रिलायन्स (Reliance) 'फॅशन फॅक्टरी' स्टोअर्समध्ये 20 जुलैपर्यंत वैध असेल. 'फॅशन फॅक्टरी' आधीच त्यांच्या मोठ्या ब्रँड्सवर मोठ्या सवलती देण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि आता या एक्सचेंज फेस्टिव्हल अंतर्गत तुम्ही जुने कपडे देऊन नवीन ब्रँडेड कपडे खरेदी करु शकता.

या कपड्यांवर एक्सचेंज उपलब्ध असेल

तुम्ही तुमचे जुने डेनिम, शर्ट, टी-शर्ट किंवा मुलांचे कपडे फॅशन फॅक्टरी स्टोअरमध्ये आणून एक्सचेंज करु शकता. त्या बदल्यात तुम्हाला स्टोअरकडून एक्सचेंज व्हाउचर दिले जातील, ज्याची किंमत खालीलप्रमाणे असेल.

डेनिमच्या बदल्यात - 400 पर्यंतचे व्हाउचर

शर्टच्या बदल्यात - 250 पर्यंतचे व्हाउचर

टी-शर्टच्या बदल्यात - 150 पर्यंतचे व्हाउचर

मुलांच्या कपड्यांच्या बदल्यात - 100 पर्यंतचे व्हाउचर

तसेच, दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तू खरेदी करताना किंवा नवीन ब्रँडेड कपडे खरेदी करताना तुम्ही हे व्हाउचर वापरु शकता.

कोणत्या ब्रँडचा समावेश असेल?

दरम्यान, या एक्सचेंज फेस्टिव्हल दरम्यान, ग्राहक ली, ली कूपर, जॉन प्लेयर्स, रेमंड, पार्क अव्हेन्यू, कॅनो, पीटर इंग्लंड, अॅलन सॉली, व्हॅन ह्यूसेन आणि लुई फिलिप सारख्या सुप्रसिद्ध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडकडून खरेदी करु शकतात. कंपनी ग्राहकांना नवीन खरेदीवर जास्तीत जास्त 50 टक्क्यांपर्यंत सूट देत आहे, ज्यामुळे ही एक्सचेंज ऑफर आणखी आकर्षक बनली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; रवींचा आशयघन विनोद

Valpoi: विद्यार्थ्यांनी घेतला 'कृषी'चा प्रत्यक्ष अनुभव, युनिटी हायस्कूलचा बिबे-धावे-सत्तरीत शैक्षणिक अभ्यास दौरा

Mopa Airport: 'मोपा'वर 11 दारू आउटलेट्स कार्यरत, 80% व्यवसाय गोव्याबाहेरील कंपन्यांच्या ताब्यात

Ind Vs Eng: 'सर जडेजा'च्या नावावर मोठा विक्रम! गॅरी सोबर्सना टाकले मागे; 'हा' रेकॉर्ड करणारा बनला पहिलाच खेळाडू

Shigao: शिगावच्या देवस्थानात चोरीचा प्रयत्न फसला, पोलिस पेट्रोलिंग व्हॅन पाहून चोरांनी जंगलात धूम ठोकली

SCROLL FOR NEXT