Mukesh Ambani & Gautam Adani: कमाईसोबतच दान देण्यातही अदानी-अंबानी अग्रेसर

Manish Jadhav

बिझनेस फॅमिली

2023-24 (FY24) च्या आकडेवारीनुसार, देशातील चार बिझनेस फॅमिली टाटा, अंबानी, अदानी आणि बिर्लाद्वारा चालवणाऱ्या जाणाऱ्या कंपन्यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) योगदानात 20 टक्के योगदान दिले.

Mukesh Ambani & Gautam Adani | Dainik Gomantak

1,000 कोटी रुपयांपर्यंत योगदान

इंडिया फिलान्थ्रॉपी रिपोर्ट 2025 नुसार, या कंपन्यांनी सीएसआरसाठी प्रति 800 ते 1000 कोटी रुपयांचे योगदान दिले. त्याचवेळी, सीएसआर खर्चात टॉप 2 टक्के व्यावसायिक घराण्यांचा वाटा 50 ते 55 टक्के नोंदवला गेला. कंपनी कायदा 2013 च्या कलम 135 अंतर्गत, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने काही व्यवसायांना त्यांच्या निव्वळ नफ्याच्या किमान 2 टक्के शिक्षण, आरोग्यसेवा, ग्रामीण विकास आणि पर्यावरणीय शाश्वतता यासारख्या क्षेत्रांमध्ये योगदान देण्याचे निर्देश दिले होते.

Money | Dainik Gomantak

आर्थिक वर्ष 2022-23

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये, एकूण 24,392 कंपन्यांनी क्रीडा, आरोग्य आणि स्वच्छता, झोपडपट्टी विकास, कला आणि संस्कृती आणि इतर 14 क्षेत्रांमध्ये सीएसआर उपक्रमांवर कोट्यवधी रुपये खर्च केले. आज (27 फेब्रुवारी) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून भारतातील टॉप सीएसआर खर्च करणाऱ्या कंपन्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

Money | Dainik Gomantak

एचडीएफसी बँक

यामध्ये सर्वात टॉपवर एचडीएफसी ही बँक आहे, जी ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्यसेवा आणि आर्थिक साक्षरता यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या सीएसआर प्रयत्नांसाठी ओळखली जाते. 41,165 कोटी रुपयांच्या सरासरी निव्वळ नफ्यापैकी, एचडीएफसीने सीएसआरवर 800 कोटी रुपये खर्च केले, ज्यामुळे ती भारतातील सर्वाधिक सीएसआर खर्च करणाऱ्या कंपन्यांपैकी एक बनली.

HDFC | Dainik Gomantak

टाटा

टाटांचा सीएसआर उपक्रम भविष्यातील विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित शिक्षणावर लक्ष केंद्रित करतो. टीसीएसने शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छता आणि सागरी संवर्धनावर सीएसआर म्हणून सुमारे 774 कोटी रुपये खर्च केले.

Tata | Dainik Gomantak

रिलायन्स

2022-23 या आर्थिक वर्षात, रिलायन्स इंडस्ट्रीजने सीएसआर उपक्रमांमध्ये 743 कोटी रुपयांहून अधिक खर्च केले.

Reliance Industries | Dainik Gomantak

एनटीपीसी

भारतातील सर्वात मोठी वीज कंपनी असलेल्या एनटीपीसीने त्यांच्या सीएसआर उपक्रमांसाठी सुमारे 320 कोटी रुपये खर्च केले.

NTPC | Dainik Gomantak
Pumpkin Seeds | Dainik Gomantak
आणखी बघा