Reliance Recruitment Dainik Gomantak
अर्थविश्व

रिलायन्सने केली प्रसिद्ध फॅशन ब्रँड अबू जानी संदीप खोसलामध्ये मोठी गुंतवणूक

आता फॅशनच्या रूपात भारतीय कला आणि संस्कृती संपूर्ण जगासमोर नेली जाईल.

दैनिक गोमन्तक

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने अवघ्या वर्षभरात तिसर्‍या दिग्गज फॅशन ब्रँडमध्ये मोठा हिस्सा खरेदी केला आहे. RIL ची उपकंपनी असलेल्या रिलायन्स ब्रँड्स लिमिटेड (RBL) ने मंगळवारी सांगितले की, ते लवकरच फॅशन हाऊस अबू जानी संदीप खोसला (AJSK) मधील 51 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. (famous fashion Brands Abu Jani Sandeep khosla)

दोन्ही कंपन्यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनानुसार, RBL ने एकतर स्वतःहून किंवा तिच्या उपकंपनीद्वारे AJSK मध्ये गुंतवणूक करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. कराराची रक्कम अद्याप उघड करण्यात आलेली नाही. मात्र AJSK मध्ये रिलायन्सचा बहुसंख्य हिस्सा (51 टक्के) असूनही अबू जानी आणि संदीप खोसला ब्रँडच्या डिझाइन आणि सर्जनशील पैलूंचे नेतृत्व करत राहतील असे सांगण्यात आले आहे.

एका वर्षातील तिसरा फॅशन ब्रँड

रिलायन्स आता फॅशन क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी कंपनी बनण्याच्या मार्गावर आहे. अवघ्या वर्षभरात कंपनीने देशातील तीन दिग्गज फॅशन ब्रँड्समध्ये भागभांडवल विकत घेतले आहे. गेल्या वर्षी, फॅशन जगतातील सुप्रसिद्ध ब्रँड मनीष मल्होत्रामध्ये गुंतवणूक केली होती, तर ऑक्टोबर 2021 मध्ये, रिलायन्स रिटेलने फॅशन डिझायनर रितू कुमारच्या कंपनी रितिका प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 52 टक्के हिस्सा खरेदी केला होता. इतकेच नाही तर नवीन फॅशन लेबल तयार करण्यासाठी कंपनीने 2022 च्या सुरुवातीला राहुल मिश्रासोबत भागीदारी केली होती.

तीन फॅशन लेबलने भरपूर कमाई केली

अबू जानी आणि संदीप खोसला या तीन फॅशन लेबलने जगात खूप नाव कमावले आहे. हा ब्रँड त्याच्या ट्रेंडी शैली आणि गुणवत्तेसाठी ओळखला जातो. कंपनीच्या तीन फॅशन लेबलने जगभरात खूप नाव कमावले आहे. यात महिलांच्या पोशाख लेबल ASAL, महिलांसाठी फॉर्मल लेबल आणि पुरुषांसाठी औपचारिक आणि लग्नाच्या प्रसंगी घालण्यात येणाऱ्या कपड्यांची विशेष ओळख आहे.

भारतीय कला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल

रिलायन्स रिटेलच्या संचालिका ईशा अंबानी म्हणाल्या, ज्या कारागिरांनी जवळपास तीन दशके भारतात आपली फॅशन कला दाखवली त्यांच्यासोबत भागीदारी करण्यास मी खूप उत्सुक आहे. या भागीदारीद्वारे जुन्या ब्रँडला नवे व्यासपीठ मिळेल आणि आम्ही भारतीय कला जगाच्या कानाकोपऱ्यात नेऊ शकू.

या भागीदारीबद्दल आनंद व्यक्त करताना अबू जानी आणि संदीप खोसला म्हणाले की, गेल्या 35 वर्षांपासून आम्ही भारतीय संस्कृतीशी संबंधित फॅशन लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. आता रिलायन्समध्ये सहभागी होऊन आमचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्टही पूर्ण होईल. आता फॅशनच्या रूपात भारतीय कला आणि संस्कृती संपूर्ण जगासमोर नेली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: राज्यात राजकीय घडामोडी, मुख्यमंत्री सावंतांनी दिल्लीत घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; गोवा भेटीचं दिलं निमंत्रण

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये शतकांचा दुष्काळ! टी20 फॉरमॅटमध्ये दोनच फलंदाजांनी केली कमाल; एक किंग कोहली, दुसरा कोण?

Goa London Flight: अहमदाबाद क्रॅशनंतर बंद झालेली एअर इंडियाची गोवा - लंडन विमानसेवा पुन्हा सुरु होणार, बुकिंग सुरु; वाचा वेळापत्रक

‘नोरा फतेहीसारखं फिगर बनव, नाहीतर…’, नवऱ्याच्या छळाला कंटाळून महिलेची पोलिसात धाव; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Politics: ठरलं! दिगंबर कामत, रमेश तवडकर होणार मंत्री; गुरुवारी 12 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा

SCROLL FOR NEXT