'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीचे 26 वर्षांनी बॉलीवूडमध्ये पुनरागमन

90 च्या दशकात तिने आपल्या कामाने लोकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले होते
Mandakini Bollywood Comeback | Ram Teri Ganga Maili Fame Actress Comback
Mandakini Bollywood Comeback | Ram Teri Ganga Maili Fame Actress CombackDainik Gomantak
Published on
Updated on

राज कपूर यांच्या 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातून लोकप्रिय झालेली मंदाकिनी पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे. 90 च्या दशकात तिने आपल्या कामाने लोकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले होते, परंतु 1996 मध्ये तिने चित्रपटसृष्टीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला, परंतु पुन्हा एकदा ती पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. (Mandakini Bollywood Comeback)

Mandakini Bollywood Comeback | Ram Teri Ganga Maili Fame Actress Comback
शाहरुख खानने पुढच्या चित्रपटाची केली घोषणा, नाव आणि रिलीजची तारीख जाहीर

मंदाकिनी तिचा मुलगा रबिल ठाकूरच्या म्युझिक व्हिडिओमध्ये आईच्या भूमिकेत दिसणार आहे. 'माँ ओ मा' असे या गाण्याचे नाव आहे. याचे लेखन साजन अग्रवाल यांनी केले असून ते दिग्दर्शनही करणार आहेत. गाण्याबद्दल बोलताना मंदाकिनी म्हणाली की, हे खूप सुंदर गाणे आहे.

मंदाकिनीने सांगितले की, मी पुनरागमनाबद्दल खूप उत्सुक आहे. मी साजन अग्रवाल यांना अनेक वर्षांपासून ओळखते आणि आता आम्ही दोघे एकत्र काम करत आहोत. 'मा ओ माँ' हे गाणे खूप सुंदर आहे आणि ते ऐकताच मी प्रेमात पडले. या गाण्याचे शूटिंग एप्रिलच्या अखेरीस सुरू होणार आहे. (Mandakini Bollywood Comeback)

ज्येष्ठ दिग्दर्शक राज कपूर दिग्दर्शित मंदाकिनी यांचा 'राम तेरी गंगा मैली' हा चित्रपट 1985 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मंदाकिनीने धबधब्याखाली आंघोळीचा सीन केल्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली होती, त्यानंतर ती रातोरात स्टार बनली. मात्र काही काळ चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी बॉलिवूडला अलविदा केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com