UPI payment Dainik Gomantak
अर्थविश्व

UPI Payment: युपीआय पेमेंटसाठी आता मोजावे लागणार पैसे, लवकरच निर्णय जाहीर होण्याची शक्यता

गोमन्तक डिजिटल टीम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India) UPI पेमेंटवर शुल्क आकारण्याच्या तयारीत आहे. नोटाबंदीनंतर गेल्या 5 वर्षांत, युनिफाइड पेमेंट इंटरफेस (Unified Payment Interface) किंवा UPI सेवा वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतातील डिजिटल पेमेंटच्या बाबतीत, UPI हे सामान्य लोकांसाठी तसेच छोट्या व्यावसायिकांसाठी सर्वात मोठा आधार म्हणून उदयास आले आहे. UPI च्या आगमनाने ऑनलाइन पेमेंट करणे खूप सोपे झाले आहे. आता पैसे खिशात ठेवण्याऐवजी लोक UPI द्वारे पैसे भरणे हा सोपा पर्याय आहे असं मानतात.

यूपीआयच्या वाढत्या ट्रेंडनंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यातून पैसे कमविण्याचा विचार करत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच एक प्रस्ताव सादर केला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, ग्राहकांना UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी आता पैसे मोजावे लागतील. हे बँकेकडून केलेल्या IMPS पेमेंटसारखे असू शकते.

पेमेंट सिस्टीममध्ये चार्जेसवरील डिस्कशन पेपर नावाने प्रसिद्ध झालेल्या या पेपरमध्ये असे म्हटले आहे की भारतीय रिझर्व्ह बँक आता UPI पेमेंटसाठी देखील पैसे आकारू इच्छित आहे. UPI पेमेंट सिस्टम ही बँकेच्या IMPS सारखी आहे आणि बँका IMPS साठी शुल्क आकारतात, त्यामुळे UPI पेमेंटवर देखील शुल्क आकारले जावे.

बँकांनी अशी प्रणाली बनवावी जेणेकरून UPI ​​पेमेंट कोणत्याही अडचणीशिवाय करता येईल. यामुळे बँकांवरील बोजा वाढेल आणि UPI पेमेंटसाठी ग्राहकांकडून शुल्क आकारून त्याची भरपाई करावी असे आरबीआयने या अहवालात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 2nd Test: 'तो आतून खचला असेल...' सिराजला पुन्हा संघाबाहेर ठेवल्यानं दिग्गज भडकले! कैफ, मुनाफ पटेल अन् जाफर यांनी निवडकर्त्यांना घेतलं फैलावर

ST Reservation: आरक्षणाचा तिढा सोडवण्यास सरकार सरसावले; 7 डिसेंबरपासून सुनावणी, केंद्राचे प्रतिज्ञापत्र सादर

Student Visa Fraud: मुलीला कॅनडात शिकवण्याचे स्वप्न पडले महागात; व्हिसाच्या आमिषाने लाखोंचा गंडा

999cc इंजिन, 215 bhp पॉवर अन् 300 किमी प्रतितासापेक्षा जास्त वेग! BMW ची सर्वात दमदार सुपरबाईक भारतात लॉन्च; किंमत जाणून घ्या

Under 11 National Badminton: गोव्याची अमायरा धुमटकर विजेतेपदाच्या उंबरठ्यावर, 11 वर्षांखालील राष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये छाप

SCROLL FOR NEXT