RBI Cautions  Dainik Gomantak
अर्थविश्व

RBI Cautions: मोठ्या नुकसानापासून वाचण्यासाठी आरबीआयने दिली ग्राहकांना चेतावणी!

RBI: आरबीआयने म्हटले आहे की, यामध्ये अनेक अनधिकृत कंपन्या आणि लोक सामील झाल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

RBI Cautions: आरबीआयने आपल्या ग्राहकांना सावधगिरी बाळगण्याची चेतावणी दिली आहे. आरबीआयने म्हटल्यानुसार, जे ग्राहक फॉरेक्समध्ये व्यापार करत असतील तर किंवा अन्य प्रकारची कोणती घेवाणदेवाण करत असतील अशा लोकांनी सावधान होण्याची गरज आहे.

बनावट कंपन्या आणि वेबसाइट मोठ्या प्रमाणात व्यवहारात सहभागी असल्याचे दिसून येत आहे.आरबीआयकडे फसवणूक झाल्याच्या काही तक्रारी गेल्यानंतर आरबीआयने ही नोटीस जारी केली आहे.

आरबीआयने म्हटले आहे की, यामध्ये अनेक अनधिकृत कंपन्या आणि लोक सामील झाल्या आहेत. त्यामुळे लोकांनी अधिक सावधानी बाळगण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

आरबीआय अशा गैरव्यवहार आणि फसवणूक करणाऱ्या कंपन्यावर बंदी घालण्यासाठी प्रयत्न करत आहे मात्र अशा कंपन्यावर आरबीआय पूर्णपणे बंदी घालू शकले नाही.

दरम्यान, आरबीआयने गेल्या वर्षी 3फेब्रुवारी 2022 ला सामान्य जनतेला अनाधिकृत फॉरेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मविरुद्ध सतर्क केले होते.

महत्वाचे म्हणजे, आरबीआय( RBI )ने अशा संस्थांची सूची जाहीर केली होती जी फेमा अंतर्गत फॉरेक्स व्यवहार करण्यासाठी अधिकृत नाहीत.याबरोबरच अशा कंपन्यांची नावेही जाहीर केली होती जी इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग करण्यास योग्य नाहीत.

फसवणूक करणाऱ्या कंपन्या सोशल मिडिया( Social Media )चा वापर करुन प्रशिक्षण देण्याच्या अमिषातून फसवणूक करु शकतात.त्यामुळे जे नागरिक फॉरेक्स ट्रेडिंग करत आहेत त्यांना आरबीआयने अशा फसवणूकीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT