RBI  DaINIK Gomantak
अर्थविश्व

RBI ने HDFC ला ठोठावला लाखोंचा दंड, ग्राहकांना माहित आहे का कारण?

RBI Imposes Penalty: नॅशनल हाऊसिंग बँकेच्या (NHB) काही तरतुदी पूर्ण न केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने HDFC (HDFC) वर दंड ठोठावला आहे.

Manish Jadhav

RBI Imposes Penalty: नॅशनल हाऊसिंग बँकेच्या (NHB) काही तरतुदी पूर्ण न केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने HDFC ला दंड ठोठावला आहे.

आरबीआयने हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एचडीएफसी लिमिटेड) ला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

आरबीआयने दिलेल्या माहितीत असे सांगण्यात आले की, 31 मार्च 2022 पर्यंत कंपनीच्या आर्थिक स्थितीच्या आधारावर एनएचबीने कंपनीची वैधानिक तपासणी केली होती.

घोषित बँक खात्यांमध्ये रक्कम हस्तांतरित केलेली नाही

आरबीआयच्या (RBI) निवेदनात असे सांगण्यात आले की, तपासादरम्यान हे उघड झाले आहे की कंपनी 2019-20 मध्ये काही ठेवीदारांच्या मुदतपूर्ती ठेवी त्यांच्या घोषित बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करु शकली नाही.

निवेदनानुसार, यानंतर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली की, दंड का आकारु नये. त्यात म्हटले आहे की, 'कंपनीच्या उत्तराचा विचार केल्यानंतर, तरतुदींचे पालन न केल्याचा आरोप पुरेसा असून त्यावर दंड ठोठावण्यात यावा, या निष्कर्षाप्रत रिझर्व्ह बँक आली.'

असा सवाल करत कोट्यवधींचा दंड ठोठावला होता

बँकिंग नियमांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयने यापूर्वीही बँकांना दंड ठोठावला आहे. निर्देशांचे पालन न केल्याबद्दल मुंबईच्या (Mumbai) झोरोस्ट्रियन को-ऑपरेटिव्ह बँकेला 1.25 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यावर आरबीआयने म्हटले होते की, झोरोस्ट्रियन बँक रिस्ट्रिक्टेड लेटर ऑफ क्रेडिट (एलसी) वरील सूचना आणि नियमांच्या तरतुदींचे पालन करण्यात अयशस्वी ठरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud: गोव्यातील व्हिलांमधून 900 कोटींचे कथित सायबर रॅकेट! मुंबई पोलिसांची कारवाई; 22 जणांना अटक

Goa Liberation Day: मुक्तिदिनापूर्वी सर्व मुंडकार प्रकरणे निकाली काढणार! CM सावंतांची घोषणा; रवी नाईक यांच्या वारसदाराबाबत मौन

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT