RBI Governor Dainik Gomantak
अर्थविश्व

PNB-यूनियन-इंडियन बँक ग्राहकांचे बल्ले-बल्ले, RBI गव्हर्नरांची मोठी घोषणा

UPI: जर तुमचे खाते पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), युनियन बँक ऑफ इंडिया किंवा इंडियन बँकेत असेल तर ही बातमी तुम्हाला नक्कीच आनंदित करेल.

दैनिक गोमन्तक

UPI On Credit Card: जर तुमचे खाते पंजाब नॅशनल बँक (PNB), युनियन बँक ऑफ इंडिया किंवा इंडियन बँकेत असेल तर ही बातमी तुम्हाला नक्कीच आनंदित करेल. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी या तिन्ही बँकांचे खातेदार आणि क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. अलीकडे, एका कार्यक्रमात, RBI गव्हर्नरांनी UPI नेटवर्कवर रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केले होते. रिझर्व्ह बँकेच्या या घोषणेनंतर क्रेडिट कार्डधारकांना आनंद होणार आहे.

UPI रुपे क्रेडिट कार्डशी लिंक केले जाईल

सध्या UPI शी डेबिट कार्ड व्यतिरिक्त खाती लिंक करण्याची सुविधा आहे. पण आता तुम्ही रुपे क्रेडिट कार्ड UPI शी लिंक करु शकाल. आरबीआयने याआधी पंजाब नॅशनल बँक (PNB), युनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँकेच्या (Indian Bank) ग्राहकांना ही सुविधा दिली आहे. येत्या काळात खासगी बँकांसाठीही ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे.

व्हर्च्युअल पेमेंट अ‍ॅड्रेसशी जोडले जाईल

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI विकसित केले आहे. याचा फायदा ग्राहक आणि व्यापारी दोघांनाही होणार असल्याचे एनपीसीआयकडून सांगण्यात आले. रुपे क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्याने क्रेडिट इकोसिस्टमची व्याप्ती वाढेल. RuPay क्रेडिट कार्ड व्हर्च्युअल पेमेंट अ‍ॅड्रेसशी लिंक केले जाईल, जे पूर्णपणे सुरक्षित आहे.

सीमापार व्यवहार सुविधा सुरु केली

या काळात रुपे क्रेडिट कार्ड व्यतिरिक्त, UPI लाइट देखील लॉन्च करण्यात आले आहे. कमी मूल्याच्या व्यवहारांसाठी, ते ऑन-डिव्हाइस वॉलेटच्या मदतीने कार्य करेल. भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) अंतर्गत क्रॉस बॉर्डर व्यवहारांची सुविधा देखील सुरु करण्यात आली आहे. UPI Lite च्या माध्यमातून ग्राहक इंटरनेटशिवाय पेमेंट करु शकतील. याद्वारे 200 रुपयांपर्यंतचे पेमेंट करता येते. क्रॉस बॉर्डर बिल पेमेंट सिस्टमसह, तुम्ही परदेशात राहून भारतात (India) बिले भरण्यास सक्षम असाल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT