करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PNB देतेय पूर्ण 50,000 रुपये, पैसे थेट खात्यात येणार

PNB Kisan Scheme: पंजाब नॅशनल बँकेने शेतकऱ्यांसाठी खास योजना आणली आहे.
 PNB
PNB Dainik Gomantak

PNB Kisan Scheme: पंजाब नॅशनल बँकेने शेतकऱ्यांसाठी खास योजना आणली आहे, ज्यामध्ये तुम्हाला आर्थिक मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना बँकेकडून 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. हे पैसे तुम्ही शेतीशिवाय तुमच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरु शकता. विशेष म्हणजे, हे पैसे तुम्हाला बँकेच्या कोणत्या स्कीम अंतर्गत दिले जात आहेत आणि तुम्ही त्यासाठी अर्ज कसा करु शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील

पंजाब नॅशनल बँक 'पीएनबी किसान तत्काळ कर्ज योजनेची' सुविधा ग्राहकांना देत आहे, ज्या अंतर्गत हे पैसे शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात जमा केले जातील. पीएनबीने (PNB) ट्विट करुन या सुविधेची माहिती दिली आहे. या योजनेत नेमकं काय खास आहे, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत-

 PNB
ग्राहकांमध्ये निराशा, PNB बँकेने बंद केली ही सुविधा

पीएनबीने ट्विट केले

पीएनबीने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'प्रत्येक शेतकऱ्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पीएनबीने किसान तत्काळ कर्ज योजना आणली आहे.'

कोणत्याही कामासाठी कर्ज घेता येते

पंजाब नॅशनल बँकेने सांगितले आहे की, 'या योजनेअंतर्गत तुम्हाला शेतीसाठी किंवा घरगुती गरजांच्या पूर्ततेसाठी कर्ज घेऊ शकता. त्याचबरोबर, तुम्ही इतर कोणत्याही प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या योजनेचा लाभ घेऊ शकता. किसान तत्काळ कर्ज योजना प्रत्येक मदतीसाठी तयार आहे.'

 PNB
PNB ग्राहकांनो लक्ष द्या! बँकेने वाढवले हे महत्त्वाचे शुल्क, वाचा सविस्तर

कोणत्या लोकांना मिळणार फायदा?

PNB तत्काळ कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही कृषी क्षेत्रात काम करणारे शेतकरी किंवा शेतजमिनीचे भाडेकरु असणे आवश्यक आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, फक्त शेतकरी किंवा शेतकरी गट, ज्यांच्याकडे आधीच किसान क्रेडिट कार्ड (KCC) आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल. यासाठी त्यांच्याकडे मागील दोन वर्षांचे अचूक बँक रेकॉर्ड असणे आवश्यक आहे.

सेवा शुल्क भरावे लागणार नाही

बँकेच्या (Bank) अधिसूचनेनुसार, शेतकर्‍यांना किसान तत्काळ कर्ज योजनेअंतर्गत त्यांच्या विद्यमान कर्ज मर्यादेच्या 25 टक्क्यांपर्यंत कर्ज दिले जाईल, कमाल मर्यादा 50,000 रुपये आहे. हे कर्ज घेण्यासाठी शेतकर्‍यांना काहीही तारण ठेवण्याची गरज नाही किंवा त्यांना कोणतेही सेवा शुल्क भरावे लागणार नाही.

 PNB
PNB Scam: नीरव मोदीचा सहकारी सुभाष शंकरला 26 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी

कर्जाची परतफेड 5 वर्षांत करता येते

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी जास्तीत जास्त 5 वर्षांचा कालावधी दिला जाईल. या कर्जाचे हप्तेही सोपे ठेवण्यात आले आहेत, जेणेकरुन शेतकऱ्यांना परतफेड करताना कोणतीही अडचण येऊ नये.

 PNB
PNB ने केली बचत खात्याच्या व्याजदरात कपात

ऑनलाइन आणि ऑफलाइन कर्ज कसे घ्यावे

कर्ज घेण्यासाठी शेतकरी पीएनबीच्या शाखेत जाऊन अर्ज करु शकतात. येथे तुम्ही फॉर्म मागवून कर्जासाठी अर्ज करु शकता. त्याच वेळी, ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com