PNB खातेधारकांचे बल्ले-बल्ले, आता मिळणार 8 लाखांचा बंपर फायदा; जाणून घ्या कसे

PNB Latest News: तुम्हीही पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
PNB
PNBDainik Gomantak
Published on
Updated on

PNB Insta Loan: तुम्हीही पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक आपल्या ग्राहकांना प्रचंड सुविधा देत आहे. पीएनबी बँकेच्या ग्राहकांना आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज असल्यास बँक तुम्हाला 8 लाख रुपये सहज काढण्याची सुविधा देत आहे. जर तुम्हालाही पैशांची गरज असेल तर तुम्ही या विशेष सुविधेअंतर्गत बँकेतून पैसे घेऊ शकता. तुम्हीही या सुविधेचा लाभ घेऊ शकता, चला तर मग जाणून घेऊया...

मोबाईल नंबरवरुन मिळणार कर्ज!

वास्तविक, पंजाब नॅशनल बँक (PNB) आपल्या ग्राहकांना 'इन्स्टा लोन'द्वारे 8 लाख रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे. जर तुम्हाला या सुविधेअंतर्गत पर्सनल लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला हे कर्ज सहज मिळेल. बँकेने ट्विट करुन आपली प्रक्रिया स्पष्ट केली आहे.

PNB
करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PNB देतेय पूर्ण 50,000 रुपये, पैसे थेट खात्यात येणार

पीएनबीने ट्विट करुन माहिती दिली

पंजाब नॅशनल बँकेने ट्विटमध्ये म्हटले की, 'बँकेकडून कर्ज (Loan) घेणे आता जेवण ऑर्डर करण्याइतके सोपे झाले आहे. तुम्ही कमी व्याजदरासह पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेकडून इन्स्टा कर्जासाठी अर्ज करु शकता. अधिक माहितीसाठी, तुम्ही tinyurl.com/t3u6dcnd या लिंकवर क्लिक करुन वेबसाइटला भेट देऊ शकता.'

म्हणजेच, आता पीएनबीकडून कर्ज घेणे खूप सोपे झाले आहे. या कर्जामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. एवढेच नाही तर काही मिनिटांत तुम्हाला हे कर्ज मिळेल.

PNB
ग्राहकांमध्ये निराशा, PNB बँकेने बंद केली ही सुविधा

याचा फायदा कोण घेऊ शकतो

PNB चा लाभ घेण्यासाठी, ग्राहक हा केंद्र सरकार (Central Government), राज्य सरकार किंवा PSU कर्मचारी असावा.

हे कर्ज काही मिनिटांत वितरित केले जाते.

या कर्जाची सुविधा 24*7 उपलब्ध आहे.

या अंतर्गत ग्राहकांना 8 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते.

यामध्ये प्रोसेसिंग फी शून्य आहे.

म्हणजेच, तुम्ही PNB चे ग्राहक असाल तर आता तुम्ही 8 लाखांपर्यंतचे कर्ज सहज घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com