Gold |RBI |RBI Gold Reserve Deposits| Bank  Dainik Gomantak
अर्थविश्व

रिझर्व्ह बँकेच्या सोन्याच्या साठ्यात मोठी वाढ

RBI Gold Reserve Deposits: रिझर्व्ह बँकेच्या सोन्याच्या साठ्यात मोठी वाढ झाली असून मागील आर्थिक वर्षात आरबीआयने 65 टन सोनं खरेदी केले.

दैनिक गोमन्तक

सोन्यामध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित समजल्या जाते.वाढती महागाई आणि शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीच्या काळात अनेक लोकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली आहे. मागील एक वर्षभरात देशातची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँकेने (RBI) आपली सोनं खरेदी दुप्पट केली आहे. वर्ष 2021-22 या वर्षामध्ये रिझर्व्ह बँकेने 65 टन सोन्याची खरेदी केली आहे. आता आरबीआयकडे सोन्याचा साठा वाढला असून 760.42 टन इतका झाला आहे. मागील दोन वर्षात आरबीआयने 100 टन सोनं खरेदी केली आहे. (RBI Gold Reserve Deposits News)

जागतिक पातळीवर सुरू असलेला तणाव आणि जागतिक बाजारात सुरू असलेल्या घडामोडी लक्षात घेता चांगला परतावा आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी रिझर्व्ह बँकेने सोनं खरेदी केली असल्याचे म्हटले जात आहे. जून 2020 ते मार्च 2021 या दरम्यान रिझर्व्ह बँकेने 33.9 टन सोने खरेदी केली होती. मात्र, 2021-2022 मध्ये आरबीआयने दुप्पट म्हणजे 65 टन सोने खरेदी केले होते.

3.22 लाख कोटी रुपयांचे सोने

आरबीआयच्या गोल्ड होल्डिंगचे मूल्य 30 टक्क्यांनी वाढून 3.22 लाख कोटी रुपये झाले आहेत. यातील 1.25 लाख कोटी रुपयांचे सोनं हे आरबीआयच्या इश्यू डिपार्टमेंट अॅण्ड गोल्ड जवळ आहे. यामध्ये गोल्ड डिपॉझिटचा देखील समावेश आहे. तर, 1.97 लाख कोटी रुपयांचे सोनं बँकिंग डिपार्टमेंटमध्ये मालमत्ता म्हणून ठेवण्यात आले आहे. आरबीआयनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठी उसळण आणि अधिक सोनं खरेदी केल्याने आरबीआयकडील सोन्याच्या (Gold) मूल्यात वाढ झाली आहे. याशिवाय, डॉलरच्या तुलनेत रुपयात झालेली घसरण हेदेखील एक कारण असल्याचे म्हटले जात आहे.

आरबीआयकडे सोन्याचा किती साठा?

आरबीआयच्या मालमत्तेत 28.22 टक्के परदेशी चलनाचा समावेश आहे. तर, 71.78 टक्के सोनं आहे. आरबीआयकडे 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 760.42 टन सोनं होते. यामध्ये 453.52 टन सोनं हे बँक ऑफ इंग्लंडमध्ये आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटमध्ये ठेवण्यात आले आहे. तर, 295.82 टन सोने भारतात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job घोटाळा करुन तो 'गेला', देणाऱ्यांना मात्र ‘सुतक’; मडगाव इस्‍पितळात कर्मचाऱ्याकडून सहकाऱ्यांना लाखोंना गंडा

Rashi Bhavishya 19 November 2024: धनलाभ होईल, मात्र लगेच हे पैसे खर्च करू नका; त्याआधी जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT