RBI Dainik Gomantak
अर्थविश्व

RBI ने बँक ऑफ इंडिया अन् फेडरल बँकेला ठोठावला करोडोंचा दंड

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियामकांचे पालनन केल्यामुळे फेडरल बँकेला 5.72 कोटी रुपये आणि बँक ऑफ इंडियाला 70 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडिया (Bank Of India) आणि खाजगी क्षेत्रातील फेडरल बँकला (Federal Bank) मोठा झटका बसला आहे. खरेतर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नियामकांचे पालन न केल्यामुळे फेडरल बँकेला 5.72 कोटी रुपये आणि बँक ऑफ इंडियाला 70 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (RBI fines Bank of India and Federal Bank lakhs)

शुक्रवारी एका निवेदनात, मध्यवर्ती बँकेने म्हटले की आरबीआयने नियामक अनुपालनाच्या बाबतीत केवायसी मानदंड आणि निर्देशांच्या काही तरतुदींचे पालन न केल्यामुळे बँक ऑफ इंडियाला 70 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

एका निवेदनात, RBI ने फेडरल बँकेबद्दल म्हटले की, "विमा कंपनीने विमा ब्रोकिंग/कॉर्पोरेट एजन्सी सेवांमध्ये गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना कोणतेही रोख किंवा नॉन-कॅश दिले आहे की नाही हे तपासण्यात बँक अपयशी ठरली आहे.'' गुरुग्रामस्थित धानी लोन्स अँड सर्व्हिसेस लिमिटेडलाही 7.6 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

ग्राहकांच्या ठेवींवर कोणताही परिणाम होणार नाही,

बँक ऑफ इंडिया आणि फेडरल बँकेवर आरबीआयने दंड ठोठावल्यामुळे बँकेच्या ग्राहकांच्या ठेवींवर कोणताही परिणाम होणार नाही असेही यावेळी सांगण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे नियमांचे पालन न केल्याने आरबीआयने बँकांवर कारवाई केली आहे. अशा स्थितीत बँकेच्या सेवेवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाहीये.

यापूर्वीही अनेक बँकांवर दंड ठोठावण्यात आला आहे,

याआधीही आरबीआयने सेंट्रल बँक, एसबीआयसह अनेक बँकांना दंड ठोठावला आहे तसेच अलीकडेच आरबीआयने इंडियन ओव्हरसीज बँकेला 57.5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT