Ration Card Dainik Gomantak
अर्थविश्व

Ration Card Rules: 'या' 4 स्थितीत रद्द होणार तुमचे राशनकार्ड, सरकारने जारी केले नवे नियम!

Ration Card Rules: तुम्हीही राशनकार्डधारक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

Manish Jadhav

Ration Card Rules: तुम्हीही राशनकार्डधारक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून लाखो राशनकार्डधारकांना मोफत राशन सुविधा दिली जात आहे.

सरकारने (Government) जाहीर केले आहे की, या वर्षी म्हणजे 2023 मध्येही राशनकार्डधारकांना मोफत राशनचा लाभ मिळत राहील, मात्र अनेक अपात्र लोक मोफत राशनचा लाभ घेत असल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे या लोकांवर मोठी कारवाई केली जाईल.

स्वतःहून राशनकार्ड रद्द करुन घ्यावे

यासाठी अशा लोकांनी स्वतःहून त्यांचे राशनकार्ड (Ration Card) रद्द करुन घ्यावीत, असे आवाहन शासनाच्या वतीने जनतेला करण्यात येत आहे. राशनकार्ड रद्द न झाल्यास खाद्य विभागाचे पथक पडताळणीनंतर ते रद्द करेल. अशा लोकांवरही कारवाई होऊ शकते.

जाणून घ्या सरकारचा काय नियम आहे?

जर एखाद्या कार्डधारकाकडे 100 चौरस मीटरचा प्लॉट/फ्लॅट किंवा चारचाकी वाहन /ट्रॅक्टर, शस्त्र परवाना, गावात दोन लाखांपेक्षा जास्त आणि शहरात तीन लाखांपेक्षा जास्त कौटुंबिक उत्पन्न, स्वतःच्या उत्पन्नातून कमावलेले असेल, तर अशा लोकांना त्यांचे राशनकार्ड तहसील आणि डीएसओ कार्यालयात सरेंडर करावे लागेल.

सरकार कायदेशीर कारवाई करेल

शासनाच्या नियमानुसार राशनकार्डधारकाने कार्ड सरेंडर केले नाही तर अशा लोकांची कार्डे तपासणीअंती रद्द केली जातील. यासोबतच त्या कुटुंबावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते. एवढेच नाही तर अशा लोकांकडून ते ज्या वेळेपासून राशन घेत आहे, त्यावेळेस राशनही वसूल केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT