Ration Card: देशभरात राशन वितरणाच्या नियमात सरकारने केला मोठा बदल, दरमहा फोर्टिफाइड तांदूळ मिळणार मोफत!

Ration Card Latest Rules: तुम्हीही सरकारकडून मोफत राशन घेत असाल तर मोदी सरकारने राशन वितरणाचा नियम बदलला आहे.
Ration Card Suspended
Ration Card Suspended Dainik Gomantak
Published on
Updated on

Ration Card Latest Rules: तुम्हीही सरकारकडून मोफत राशन घेत असाल तर मोदी सरकारने राशन वितरणाचा नियम बदलला आहे.

तुमच्यासाठी हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे, जेणेकरुन पुढच्या वेळी तुम्ही राशन घेण्यासाठी जाल तेव्हा तुमच्याकडे नवीन नियमाशी संबंधित संपूर्ण माहिती असेल.

महिला आणि बालकांमधील कुपोषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील राशनकार्डधारकांना दर महिन्याला मोफत तांदूळ देण्याची तयारी केली आहे. यासाठी सर्व राज्यांतील शिधावाटप केंद्रांना फोर्टिफाइड तांदूळ पुरवठा केला जात आहे.

हा भात पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे

जो व्यक्ती फोर्टिफाइड भात खातो त्याला लोह, फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन बी 12 मुबलक प्रमाणात मिळू शकते.

पौष्टिक घटकांनी समृद्ध असलेला हा भात साधारण तांदळासारखाच चवीला लागतो. त्याची बनवण्याची पद्धतही पारंपारिक आहे.

या भातामध्ये पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात. वास्तविक, कुपोषणाने त्रस्त असलेल्या बालकांना उत्तम आहार देण्यावर सरकारचे (Government) लक्ष आहे.

Ration Card Suspended
Ration Card: राशनकार्डधारकांना लागली लॉटरी, आता गहू-तांदळाबरोबर 'या' वस्तूही मिळणार मोफत! आदेश जारी

दर महिन्याला मोफत गहू-तांदूळ मिळेल

मोदी सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत डिसेंबर 2023 पर्यंत राशनकार्डधारकांना दरमहा गहू आणि तांदूळ मोफत देण्याची योजना आहे.

याअंतर्गत पात्र कुटुंबाला दरमहा तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू एका युनिटवर वाटप करण्यात येत आहे.

याशिवाय, अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक राशनकार्डवर (Ration Card) 21 किलो तांदूळ आणि 14 किलो गहू मोफत दिला जात आहे.

Ration Card Suspended
Ration Card: राशनकार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, मोफत राशनसह मिळणार 1000 रुपये!

आता, राशनकार्डधारकांना शासनाकडून गहू तांदूळ निश्चित प्रमाणात वाटप करण्यात येत आहे. अनेक जिल्ह्यांत फोर्टिफाइड तांदळाचे वाटप झाले आहे. जिथे वाटप मिळालेले नाही, तिथे ते लवकरच पोहोचण्यास सुरुवात होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com